चक्क! महिलेचे केले महिलांनीच अपहरण: दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल | पुढारी

चक्क! महिलेचे केले महिलांनीच अपहरण: दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा: कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीतील कंपनीत कामाला जाणाऱ्या महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात महिलांविरूध्द दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्मिला बाबासाहेब कणसे (वय ४५, रा. कुरकुंभ बारवकवस्ती, ता. दौंड) असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सुनिल बाबासाहेब कणसे (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उर्मिला कणसे राहत्या घरातून शुक्रवारी (दि.५) सकाळी ६ वाजता अल्काईल अमाईन्स कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांना अज्ञात महिलांनी अज्ञात वाहनात घालून पळवून घेवून गेल्याचे नमूद केले आहे.

Back to top button