Gang Rape : महिलेवर सामूहिक बलात्कारामुळे दिल्ली हादरली; महिनाभरातील दुसरी घटना | पुढारी

Gang Rape : महिलेवर सामूहिक बलात्कारामुळे दिल्ली हादरली; महिनाभरातील दुसरी घटना

पुढारी ऑनलाईन डेस्क : बलात्कारांच्या घटनांमुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली. दिल्लीतील पीतमपूरा भागात एका महिलेवर सामूहिक बलात्काराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

रक्षकच झाले भक्षक! दिल्लीत तरुणीवर सामूहिक बलात्‍कार; चार पोलीस कर्मचारी अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पीतमपुरा येथील मसाज पार्लरमध्ये काम करत होती. शुक्रवारी (दि.6) मसाज पार्लरचा व्यवस्थापक आणि एक ग्राहक असा दोघांनी मिळून बलात्कार केला, अशी तक्रार महिलेने पोलिसांकडे दिली. महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

महिना भरातील  दुसरी घटना

गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना समोर आली आहे. जुलैमध्ये दिल्लीत रेल्वे स्टेशन येथे महिलेवर सामुहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. विशेष म्हणजे रेल्वे पोलीसमध्ये असलेले कर्मचारीच या घटनेत आरोपी होते. वारंवार होणा-या बलात्काराच्या घटनांमुळे दिल्ली हादरली आहे.

हेही वाचा,

दिल्ली सामूहिक बलात्कार : पुरावे नष्ट करण्यासाठी पीडितेचा मृतदेह जाळला

नवी दिल्ली : बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्याची फाशी कायम

Back to top button