abhijeet khandkekar : अभिजीतचे दुरंगामधून ओटीटीवर पदार्पण | पुढारी

abhijeet khandkekar : अभिजीतचे दुरंगामधून ओटीटीवर पदार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क : हा भारताचा सर्वात मोठा देशी ओटीटी मंच आहे. या माध्यमातून अब्जावधी प्रेक्षकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. (abhijeet khandkekar ) त्यांनी अलीकडेच – दुरंगा या आगामी सीरीजची घोषणा केली. रोझ ऑडिओ व्हिज्युअल्सची निर्मिती असलेली ही ९ भागांची मालिका आहे. ही रोमँटीक थ्रीलर असून त्यात गुलशन देवैय्याह आणि द्रष्टी धामीसह अभिजीत खांडकेकर, (abhijeet khandkekar ) बरखा सेनगुप्ता, राजेश खट्टर, दिव्या सेठ, झाकीर हुसेन सहाय्यक भूमिकांत झळकणार आहेत.

अभिजीत खांडकेकर या सीरीजमध्ये क्राईम रिपोर्टर विकास सोराडे व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्याची व्यक्तिरेखा समित पटेलची खरी बाजू उलगडून लोकांसमोर आणण्याच्या प्रयत्नात दिसेल. तरीच विकासच्या मिशनची माहिती समजताच आपले बराच काळ दडपून ठेवलेले सत्य लपवण्याची खटपट समित करताना पाहायला मिळेल. अभिजीत हा लोकप्रिय मालिका आणि चित्रपट – माझ्या नवऱ्याची बायको, तुझेच मी गीत गात आहे, धर्मवीर आणि तत्सम भूमिकांसाठी ओळखला जातो. दुरंगामधील त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना अभिजीत खांडकेकर म्हणाला, “दुरंगातून मी माझा ओटीटी प्रवास सुरू करतो आहे. याचा आनंद वाटतो. फ्लॉवर ऑफ इव्हीलसारख्या एखाद्या कोरियन मालिकेचा हिंदी स्वीकार पहिल्यांदाच करण्यात आला. फ्लॉवर ऑफ इव्हील प्रचंड यशस्वी ठरल्याने हीच जादू दुरंगादेखील करेल, अशी मला आशा वाटते. मला माझ्या ड्रीम टीमसोबत, सहकलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह काम करण्याची संधी मिळते आहे. त्यांनी या मालिकेसाठी एक अभिनेता म्हणून प्रोत्साहन दिले आणि खुलवले.

त्याशिवाय मी रंगवत असलेले पात्र कथेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि माझ्या कामाबद्दल मी खरंच आनंदी आहे. माझ्या मराठी भूमिकांसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि माझ्या या प्रवासासाठी देखील ते मला साह्य करतील ही आशा आहे”.

Back to top button