मंचर : राखाडी बगळ्यास सोडले निसर्गाच्या सान्निध्यात | पुढारी

मंचर : राखाडी बगळ्यास सोडले निसर्गाच्या सान्निध्यात

मंचर, पुढारी वृत्तसेवा: निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील कानिफनाथ मंदिरात सापडलेल्या राखाडी बगळ्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. राखाडी बगळ्याबाबत नौशाद तांबोळी, सुभाष मेंगडे यांनी प्रमोद दांगट, डॉ. अतुल साबळे यांना माहिती दिली असता त्यांनी तत्काळ याबाबत वनविभागास कळविले. बगळा उडत असताना रस्ता चुकला होता. थोडा जखमी असल्याने त्याला उडता येत नसल्याने त्याच्यावर डॉ. अतुल साबळे यांनी प्राथमिक उपचार केले. वनविभागाचे कर्मचारी दहातोंडे त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले असून त्याच्यावर योग्य ते उपचार करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडणार असल्याचे सांगितले.

हा पक्षी राखाडी बगळा असून हा मूळ युरोप आशिया आफ्रिकेच्या काही भागांमध्ये आढळतो. शरद ऋतूमध्ये यातील काही पक्षी उत्तरेकडील देशांकडे स्थलांतर होतात. हा पक्षी पाणथळ प्रदेशातील असून ते तलाव, नद्या, दलदलीच्या प्रदेशात तसेच समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. पाण्यातील खेकडे, मासे व इतर जलचर यांना खाऊन ते उदरनिर्वाह करतात.

Back to top button