

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑगस्टमध्ये रिलीज होण्याआधी आमीर खानचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट वादात सापडला आहे. सोशल मीडियावर आमिर खानच्या या चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. ११ ऑगस्टला आमिरचा हा चित्रपट रिलीज होणार आहे. आमिर या चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता आहे. पण, रिलीज होण्याआधीच हा चित्रपट बॅकफूटवर आहे. हिंदीमध्ये आतापर्यंत या चित्रपटाचे प्रमोशन झालेले नाही. तो आपल्या चित्रपटाला साऊथमध्ये प्रमोट करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ आणि तेलुगुमध्येही रिलीज होणार आहे. आमिरचा हा चित्रपट हॉलीवूडचा चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रीमेक आहे. (Laal Singh Chaddha)
लाल सिंह चड्ढाची रिलीज डेट जवळ येताच सोशल मीडियावर पोस्ट, कमेंट्सचा महापूर आला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावरून बायकॉटचा ट्रेंड सुरू झाला होता. ट्विटरवर वेळोवेळी हॅशटॅग बायकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंड होत होता. आमिरचे काही समर्थकदेखील आहेत. हॅशटॅग आय सपोर्ट लाल सिंह चड्ढा देखील ट्रेंड करताना दिसत होतं. चित्रपटाला नेमका विरोध का होत आहे, हे स्पष्ट कळत नसलं तरी आमिरची जुनी वक्तव्ये, चित्रपटे आणि फोटोंवरून विरोध सुरू होता.
आमिरसोबत या चित्रपटात करीना कपूर खानदेखील आहे. सोशल मीडियावरदेखील ती निशाण्यावर आली. नेपोटिझमशी संबंधित एक व्हिडिओदेखील व्हायरल होत होता.
बॉक्स ऑफिसवर आमिरचा चित्रपट आणि अक्षय कुमारचा चित्रपट रक्षा बंधन यांची टक्कर होणार आहे. हा चित्रपटदेखील ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
हेदेखील वाचा-