HBD Taapsee Pannu : कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे तापसी, लक्झरी कार कलेक्शन आणि बरचं काही... | पुढारी

HBD Taapsee Pannu : कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे तापसी, लक्झरी कार कलेक्शन आणि बरचं काही...

पुढारी ऑनलाईन डेस्क : तापसी पन्नू बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री आहे. यासोबतच तिने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नव्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. तापसीने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपला ठसा उमटवला आहे. आज १ ऑगस्ट रोजी ती ३५ वर्षांची झालीय. (HBD Taapsee Pannu) चित्रपटसृष्टीतील यशानंतर अभिनेत्रींची जीवनशैलीही खूप बदलली आहे. अभिनेत्री तापसीचीदेखील शाही जीवनशैली आहे. तिची एकूण संपत्ती, आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शनविषयी जाणून घेऊया. तापसीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्याविषयी ही हटके माहिती.  (HBD Taapsee Pannu )

एक काळ असा होता की, तापसी चित्रपटांमध्ये डान्ससाठी ओळखली जायची; पण आज ती हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. केवळ अभिनयातच नाही तर संपत्तीतही ती श्रीमंत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे ४४ कोटी रुपये असेल.
तापसीची वार्षिक कमाई ४ कोटींहून अधिक आहे. अंदाजानुसार, तापसी पन्नू एका चित्रपटासाठी ५ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक मानधन घेते. अभिनेत्री तापसी एका प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी सुमारे २ कोटी रुपये घेते.

तापसी पन्नूचे कार कलेक्शन

तापसीकडे अनेक महागड्या कार आहेत. अभिनेत्रीकडे मर्सिडीज एसयूव्ही कार आहे, ज्याची किंमत सुमारे ५२ लाख रुपये आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे BMW ५ कार देखील आहे. या कारची किंमत सुमारे ५० लाख रुपये आहे. त्याचबरोबर तापसी पन्नूकडे रेनॉल्ट कंपनीची कार देखील आहे, ज्याची किंमत १२ ते १३ लाख रुपये आहे.

तापसीचे मुंबईत एक आलिशान घर आहे. मुंबईच्या अंधेरीमध्ये तापसीचे तीन फ्लॅट्स आहेत.  तिच्या घरात लाखो रुपयांचे इंटिरियर केले होते.

बालपणापासून तापसी शिक्षणात खूप हुशार होती. १२ वीमध्‍ये तिला ९० टक्के गुण मिळाले. १२ वीनंतर तिने गुरु तेग बहादुर इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली; पण इंजिनिअरिंग केल्यानंतर तिने मॉडलिंगकडे जाण्याचा निर्णय घेतला. दाेन वर्षे मॉडेलिंग करता करता तिला अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीही मिळाल्या.

तापसीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती. हिंदीपूर्वी तिने तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या तिन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला तेलुगू चित्रपट ‘झुम्मंडी नादम’ हा तिचा पहिला चित्रपट होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तापसीने सुमारे १०-११ साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. तापसीने २०१३ मध्ये ‘चश्मेबद्दूर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१३ मध्येच आलेल्या ‘बेबी’ चित्रपटात तापसीने गुप्तहेर ‘शबाना’ची भूमिका साकारली होती. तापसीने हळूहळू बॉलिवूडमध्ये छाप पाडायला सुरुवात केली.

‘पिंक’, ‘नाम शबाना’, ‘जुडवा-२’, ‘मुल्क’, ‘मनमर्जियां’, ‘बदला’, ‘मिशन मंगल’, ‘थप्पड’, ‘हसीन दिलरुबा’ आणि ‘रश्मी रॉकेट’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. तापसी पन्नूच्या फार कमी चाहत्यांना तिचे टोपण नाव माहित आहे. घरात तापसीला प्रेमाने ‘मॅगी’ म्हणतात. तापसीचे केस लहानपणापासूनच खूप कुरळे आहेत. त्यामुळेच कदाचित तिला मॅगी हे निक नेम पडले असावे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

Back to top button