राष्ट्रीय
मिग 21 विमाने पुन्हा केंद्रस्थानी; ताजी दुर्घटना राजस्थानमध्ये
भारतात 2007 ते 2022 या 15 वर्षांच्या काळात लष्कराची 135 विमाने नष्ट झाली आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यात अर्ध्यापेक्षा जास्त मिग लढाऊ विमाने होती. त्यातील ताजी दुर्घटना राजस्थानातील भीमडा गावी 28 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आणि त्यात आपल्याला दोन खंदे लढाऊ वैमानिक गमवावे लागले. मिग 21 विमाने त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहेत. कारण, गेल्या साठ वर्षांत 400 मिग विमाने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत.
सुखोई आणि तेजसचा समावेश
फेज आऊट प्लॅनअंतर्गत सुखोई-30 च्या 15 आणि तेजसच्या 2 स्क्वॉड्रनचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे लढाऊ विमानांची भरपाई केली जाते. विमाने सेवेतून बाहेर काढण्याची योजना निश्चित असते. कुठलेही लढाऊ विमान म्हणजे उडणारे यंत्र नाही. ते नव्या युगानुसार शक्तिशाली असणे आवश्यक आहे.
- मिग-21 विमानांचा 1963 मध्ये लष्करात समावेश.
- मिग-21 विमानांचा समावेश झाल्यानंतर 30 वर्षांच्या आत ती निवृत्त केली जातील, असे 1971 मध्ये निश्चित करण्यात आले होते. तथापि, लढाऊ ताफ्याची ताकद कायम ठेवण्यासाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. ही विमाने जुनाट झाल्यामुळे सातत्याने अपघातग्रस्त होत आहेत.
- विमान अपघातांमुळे नुकसान 2 हजार 282 कोटी रुपये.
- 2007 ते 2012 दरम्यान दरवर्षी 13 दुर्घटना.
- गेल्या 15 वर्षांत एकूण 135 विमाने कोसळली.
- या दुर्घटनांत गमावले 200 लढाऊ वैमानिक.
- 2020-21 मध्ये विमान दुर्घटनांचा दर गेल्या
50 वर्षांत सर्वात कमी. - लढाऊ विमानांच्या ताफ्यात मिग-21 च्या आता उरल्या 4 केवळ स्क्वॉड्रन.
- येत्या तीन वर्षांत बहुतांश मिग-21 सेवेतून बाहेर पडणार.
– स्त्रोत इएन विकिपीडिया

