Balwinder Safri : पंजाबी भांगड़ा स्टार गायक बलविंदर सफरी यांचे निधन, कोम्यातून बाहेर आले अन् | पुढारी

Balwinder Safri : पंजाबी भांगड़ा स्टार गायक बलविंदर सफरी यांचे निधन, कोम्यातून बाहेर आले अन्

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतून बुधवारी सकाळी पुन्हा एकदा दु:खद बातमी आली आहे. गायक बलविंदर सफरी यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. (Balwinder Safri)  त्यांचे निधन झाल्याची पुष्टी त्यांच्या कुटुंबीयांनी केलीय. पंजाबमध्ये जन्मलेले गायक बलविंदर सफारी सिंगर यांना भांगडा स्टार (भांगडा स्टार बलविंदर सफारी यांचे निधन) या नावानेही ओळखले जाते. त्यांनी १९९० मध्ये सफारी बॉईज बँडची स्थापना केली. (Balwinder Safri )

बलविंदर सफारी यांनी आपल्या गाण्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. ‘वेह पाँव भांगडा’, ‘चन मेरे मखना’, ‘यार लंगडे’ यासारख्या पंजाबी लोकांसाठी तो नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या हृदयात असेल. बलविंदर हे पंजाबी संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पंजाबी संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलविंदर हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. एप्रिलमध्ये त्यांना हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांना आणखी काही त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आले, मात्र या ऑपरेशननंतरच ते कोमात गेले. यावेळी केलेल्या सीटी स्कॅनमध्येही ब्रेन रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. ८६ दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना नुकताच डिस्चार्जही देण्यात आला. पण कोमातून बाहेर आल्यानंतर ते जीवनाची लढाई हरले.

नीरू बाजवा, गुरदास मान आणि जस्सी गिल यांसारख्या अनेक पंजाबी सेलिब्रिटींनी बलविंदर सफारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नीरू बाजवाने त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. यासोबतच पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत उत्तम गाणी दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. शेवटी त्यांनी लिहिलं – तो कायम आपल्या हृदयात जिवंत राहील.

जस्सी गिलने आपल्या इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर केला आणि लिहिले – ही भेट नेहमी लक्षात राहील. गुरदास मान यांनी इन्स्टा स्टोरीवर बलविंदर सफारी यांचा फोटो शेअर करून शोक व्यक्त केला आहे.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Neeru Bajwa (@neerubajwa)

Back to top button