पूजा मेरी जान मध्ये दिसणार हुमा कुरेशी आणि मृणाल ठाकूर | पुढारी

पूजा मेरी जान मध्ये दिसणार हुमा कुरेशी आणि मृणाल ठाकूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : निर्माता दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्स कंपनीने मंगळवारी आपल्या ‘पूजा मेरी जान’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून या चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती टीझरसोबत देण्यात आली आहे. पूजा मेरी जानमध्ये हुमा कुरेशी आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाच्या घोषणेचा टीझर व्हिडिओ खूपच मजेदार आहे. या व्हिडिओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, कुणीतरी एक ई-मेलवरील प्रेमपत्र पूजा नावाच्या मुलीला पाठवत आहे. या मेलच्या सब्जेक्टमध्ये ‘पूजा मेरी जान’ असे लिहिले आहे. मेलमध्ये पुढे टाईप केले जाते की, ‘पूजा जर तू होय म्हणालीस तर आपले प्रेम ऐतिहासिक बनून जाईल. जर नाही म्हटलीस तर मी इतिहास बनून जाईन.’  दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अभिनेत्री हुमा कुरेशी आणि मृणाल ठाकूर आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘पूजा मेरी जान’ असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाच्या घोषणेचा टीझर व्हिडीओ अत्यंत लक्षवेधी झाला आहे. त्या दाेघींशिवाय विक्रम सिंह चौहान, विजय राज यांच्याही मुख्य भूमिका आहेत. त्याची कथा कनिष्का आणि नवज्योत गुलाटी यांनी लिहिलेली आहे. नवजोत यांनी चित्रपटाचे लेखन तर केलेच पण ते दिग्दर्शकही आहेत. विपाशा अरविंदने त्याच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

चित्रपटात हुमाने सना नावाच्या मुलीची भूमिका केली आहे. मृणाल ठाकूरने पूजाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात एक वेगळी प्रेमकथा पाहायला मिळू शकते. दरम्यान, आगामी काळात हुमा ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, ‘डबल एक्सएल’, ‘तरला’ या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या ‘महाराणी’ सीरिजच्या दुसर्‍या सीझनचा टीझर काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. मृणाल ठाकूर आगामी काळात ‘पिप्पा’, ‘आँख मिचौली’ आणि ‘गुमराह’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

Back to top button