

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तू चाल पुढं' या मालिकेत वहिनीसाहेब म्हणजेच धनश्री काडगावकर दिसणार आहे. (Dhanashri Kadgaonkar) धनश्रीने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले होते. दरम्यान, ती प्रेग्नेंट असल्यामुळे काही काळ तिने अभिनयापासून ब्रेक घेतला होता. पण, आता ती पुन्हा अभिनयासाठी सज्ज झालीय. आता तिने Waghachi darkali ? म्हणत डान्स केलाय. तिने या डान्स व्हिडिओला Waghachi darkali ? अशी कॅप्शन देण्यात आलीय. हा व्हिडिओ krutikaim या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून धनश्री आणि तिची मैत्रीण डान्स करताना दिसते.
'तू चाल पुढं' ही मालिका एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची आहे. या मालिकेत ती शिल्पी नावाची भूमिका साकारतेय. ती या मालिकेतही नकारात्मक भूमिकेत दिसतेय. 'वहिनीसाहेब' हीदेखील तिची भूमिका गाजली होती. आता 'तू चाल पुढं' या मालिकेतही शिल्पीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जाईल की नाही, हे मालिका पाहिल्यानंतरच कळेल.
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. 'गंध फुलांचा गेला सांगून', 'जन्मगाठ' या मालिकांमधूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती.
'तुझ्यात जीव रंगला'मधून मिळाली प्रसिध्दी
धनश्री काडगावकर या मालिकेतून धनश्री घराघरात पोहोचली. तिची 'वहिनीसाहेब' ही भूमिका गाजली होती.