नगर : ऊसतोड मुकादमास लुटणारी टोळी जेरबंद | पुढारी

नगर : ऊसतोड मुकादमास लुटणारी टोळी जेरबंद

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम साखर कारखाना (मुळशी, जि. पुणे) येथून ऊसतोड मुकादम मजुरीची रोख रक्कम दुचाकीवर घरी घेऊन जात होते. पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात रात्री वाहन आडवून मुकादमास मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी पोलिसांनी पकडली आहे. टोळीकडून पाच लाखांची रक्कम, अन्य मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

प्रवीण ऊर्फ पप्पू दिलीप दराडे (वय 32, रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी), अंबादास नारायण नागरे (वय 31, रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी), तात्याबा पोपट दहिफळे (वय 33, रा. महिंदा, ता. आष्टी, जि. बीड), दत्तू बाबादेव सातपुते (वय 34, रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी), असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी सोपान गोरे, मनोहर शेजवळ, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, संतोष लोढे, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, विश्वास बेरड, योगेश सातपुते, सागर ससाणे, कुमार कराड, ईश्वर गर्जे, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

भिलवडे (ता. पाथर्डी) येथील संतोष शहादेव बडे संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासारसाईदार उंबरे (ता. मुळशी, जि. पुणे) येथे मुकादमकी करतात, बडे यांचा भाऊ बबन व त्यांचा मित्र आदिनाथ मिसाळ आणि आदिनाथचा भाऊ सुनील मिसाळ, अशा चौघांनी दोन मोटारसायकलवरून कारखान्यावर 28 जून रोजी गेले. तेथून परतत कमीशनचे सात लाख 70 हजार रुपये घेवून पाथर्डीकडे येताना संतोष बडे यांच्या मोटारसायकलला सायंकाळी साडेसात वाजता करंजी घाटात एक स्कॉर्पिओने अडविले. तिघे जण मास्क लावलले होते. त्यांनी संतोषला मारहाण करून गाडीची चावी घेतली. मोटारसायकलच्या डिकीतून सात लाख 70 हजार घेतले. संतोष व त्यांचा भाऊ बबन यांना काठीने मारहाण केली आणि नंतर पळून गेले. त्यानंतर आदिनाथ मिसाळ व त्यांच्या भाऊ मागून आल्यानंतर त्यांच्याकडून चावी घेवून मोटारसायकल सुरू केली. याची माहिती 28 जून रोजी गडलेल्या घटनेची फिर्याद 30 जून रोजी पोलिसात दिली होती.

वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतले ताब्यात

पोलिस पथकाने वेगवेगळ्या गावांत जावून ही कारावई केली. यात अंबादास नारायण नागरे (वय 31, रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी), तात्याबा पोपट दहिफळे (वय 33, रा. महिंदा, ता. आष्टी, जि. बीड), दत्तू बाबादेव सातपुते (वय 34, रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

गुन्हा केल्याची दिली कबुली

गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून पाच लाख रुपये, गुन्हा करण्यासाठी वापरलेली 12 लाखांची महिंद्र स्कॉर्पिओ व 40 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल, असा एकूण 17 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना मुद्देमालासह पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर केले असून, प्रवीण ऊर्फ पप्पू दराडे, अंबादास नागरे सराईत गुन्हेगार आहेत.

तपासाची चक्रे

गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा तत्काळ शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिसांनी चक्रे फिरवली. यातील पप्पू दराडे पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे त्याच्या घरी आलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिस पथकाने पागोरी पिंपळगाव येथे प्रवीण ऊर्फ पप्पू दराडे याच्याकडे घडलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी केली. त्याने सुरुवातीस चुकीचे उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली. त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार अंबादास नागरे, तात्याबा दहिफळे व दत्तु सातपुते यांच्या समवेत केल्याचे कबूल केले.

Back to top button