मन उडू उडू झालं : इंद्रा-दिपू अडकले लग्नबंधनात❤️☺️(Video) | पुढारी

मन उडू उडू झालं : इंद्रा-दिपू अडकले लग्नबंधनात❤️☺️(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मन उडू उडू झालं या मालिकेतील ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत अर्थातचं दिपू आणि इंद्रा दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खास म्हणजे इंद्रा या लग्नाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. (मन उडू उडू झालं)

‘विवाह स्पेशल’ या एपिसोड्समध्ये इंद्रा-दीपूने दाक्षिणात्य लूक केला आहे. यामध्ये इंद्राने चक्क लुंगी नेसलेली दिसते. त्यामुळे लग्नमंडपातही इंद्रा दाक्षिणात्य लूकमध्ये पाहायला मिळतोय. अजिंक्य राऊतने त्याच्या इन्स्टाग्रावर लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने अनोखी गाठ अशी कॅप्शनही दिलीय. त्याने पुढे लिहिलंय-Final few episodes of my TV show @manuduudujhalaofficial_ .

नगर : कर्जतची शिवसेना ठाकरेंच्याच पाठीशी!

तसेच ‘ही अनोखी गाठ कुणी बांधली’ हे गाणं त्याने बॅकग्राउंडसाठी वापरलं आहे. यामध्ये इंद्रा-दीपू साऊथ लूकमध्ये मराठमोळ्या रितीरिवाजाने लग्नविधी करताना दिसताहेत.

अजिंक्यने आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्या व्हिडिओला कॅप्शन लिहिण्यात आलीय की-Thank you for all the love for Indra ! #manuduudujhala #itsanhonour

दरम्यान, दीपूची भूमिका करणाऱ्या हृता दुर्गुळे साकारलीय. तिचा ‘अनन्या’ हा चित्रपट २२ जुलै रोजी प्रदर्शित झाला. तर अजिंक्यचा ‘टकाटक २’ हा चित्रपट घेऊन येतोय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

Back to top button