चित्रपट कलादिग्दर्शक दिलीप धुमाळ यांचे निधन | पुढारी

चित्रपट कलादिग्दर्शक दिलीप धुमाळ यांचे निधन

परिंचे; पुढारी वृत्तसेवा: वीर (ता. पुरंदर) येथील मराठी चित्रपटसृष्टीतील कलादिग्दर्शक दिलीप धुमाळ यांचे पुण्यात निधन झाले.
दिलीप धुमाळ हे अत्यंत प्रगल्भ चित्रकारही होते. विशेषत: अगदी सातवीत असताना त्यांनी सासवडमधील काही मंदिरांमध्ये भित्तिचित्रे काढली होती. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयानंतर त्यांनी उच्च शिक्षण मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे घेतले. पुण्यातील अनेक नामवंत जाहिरात कंपनीत त्यांनी काम केले. स्वत:ची जाहिरात कंपनी काढली.

बेडेकर मसाले, प्रवीण मसाले, जनसेवा बँक असे अनेक लोगो त्यांनी बनविले. दिलीप धुमाळ यांनीच सध्या आपण लहुजी वस्ताद साळवे यांचे जे कल्पनाचित्र पाहतो तेही त्यांनीच बनविले. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आत्मचरित्राचे कव्हरपेजसुद्धा त्यांनीच साकारले आहे. अनेक टी. व्ही. मालिका व जवळपास 35 मराठी चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले होते.

Back to top button