Anita Date : राधिकाविषयी ‘या’ गोष्टी माहिती आहेत का? | पुढारी

Anita Date : राधिकाविषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवा गडी नवं राज्य या मालिकेतून माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिका (Anita Date) म्हणजेच अनिता दाते दिसणार आहे. तिची राधिका म्हणूनचं ओळख निर्माण झाली आहे. करारी अभिनयाने सर्वांना मोहून टाकणा-या या मराठमोळ्या अभिनेत्रीविषयी तुम्हाला जाणून घ्यायला निश्चितचं आवडेल. माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेनंतर दोन वर्षांनी प्रेक्षकांना राधिकाला पुन्हा पडद्यावर पाहता येणार आहे. (Anita Date)

नेहमी साडीत दिसणारी राधिका ग्लॅमरसदेखील आहे. अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेत ती दिसली होती. स्पृहा जोशीच्या मैत्रिणीची भूमिका तिने साकारली होती. राणी मुखर्जीच्या ‘अय्या’ या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारलीय. पण, तिला खरी ओळख मिळाली ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिने राधिका ही भूमिका साकारली होती. एक संस्कारी सून म्हणून अनिताने पडद्यावर भूमिका साकारली होती. पण, रिअल लाईफमध्ये ती खूप बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहिलं तर तुम्हाला तिचं नवं रूप दिसून येईल.

नवा गडी नवं राज्य या मालिकेतून राधिका पुन्हा आपल्या भेटणार आहे. या मालिकेत अनिता दाते हिचं पात्र या जगात नसल्याचं  दाखवण्यात आलं आहे. पण, तरीही एका खोडकर भूमिकेतून ती पुन्हा एन्ट्री घेते. या मालिकेत अनिता दाते रमाच्या भूमिकेत आहे. तर आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे.

पल्लवी पाटील या मालिकेतून टीव्ही माध्यमात पदार्पण करत आहे. तर रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar)

Back to top button