Sushant Singh Rajput Case : रिया चक्रवर्तीने अनेकवेळा सुशांतला दिला होता गांजा, एनसीबीचे आरोपपत्र | पुढारी

Sushant Singh Rajput Case : रिया चक्रवर्तीने अनेकवेळा सुशांतला दिला होता गांजा, एनसीबीचे आरोपपत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : एनसीबीने अभिनेता सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. (Sushant Singh Rajput Case) त्यात रिया चक्रवर्तीच्या नावाचाही समावेश आहे. एनसीबीच्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती गांजा घेऊन सुशांत सिंह राजपूतला द्यायची असा आरोप करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अभिनेता सुशांत सिंह ड्रग्स प्रकरणात आरोपी बनवले आहे. या प्रकरणी एजन्सीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात रिया चक्रवर्तीचेही नाव आहे. एनसीबीच्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती गांजा घेऊन सुशांत सिंह राजपूतला द्यायची असा आरोप करण्यात आला आहे. रियावर कमी प्रमाणात गांजा खरेदी करून खरेदीसाठी आर्थिक मदत केल्याचाही आरोप आहे. (Sushant Singh Rajput Case)

एनसीबी चार्जशीटमध्ये म्हटले आहे की, रिया चक्रवर्तीने गांजा विकत घेतला आणि तो सुशांत सिंह राजपूतला दिला. तिने दिवंगत अभिनेत्यासाठी गांजा खरेदीसाठी अनेक वेळा पेमेंट केलं आहे.

एनसीबीने आरोपपत्रात म्हटले आहे की, “…आरोपी नंबर १० रिया चक्रवर्ती हिला गांजाची अनेकदा डिलीव्हरी आरोपी नंबर ६ सॅम्युअल मिरांडा, आरोपी नंबर ७ शौविक चक्रवर्ती आणि आरोपी नंबर ८ दीपेश सावंत आणि इतरांकडून मिळाल्या होत्या. तिने गांजा सुशांत सिंह राजपूतला दिला. मार्च, २०२० आणि सप्टेंबर, २०२० या दरम्यान गांजा डिलीव्हरीसाठी पेमेंट केलं होतं. त्यामुळे तिच्यावर हा आरोप आहे.”

पुणे : जिल्हा असा झाला केरोसीनमुक्त

सुशांत सिंह राजपूतशी संबंधित या ड्रग्ज प्रकरणात एजन्सीने रिया चक्रवर्तीसह इतर ३४ जणांना आरोपी केले आहे.

 

Back to top button