रायगड : सुधागड येथे आंबा, सरस्वती नद्यांना महापूर | पुढारी

रायगड : सुधागड येथे आंबा, सरस्वती नद्यांना महापूर

सुधागड (रायगड), पुढारी वृत्‍तसेवा : रायगड जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सूरू आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्याने गावांना जोडणाऱ्या भेरव, पाली, नांदगाव नदी पुलांवरून पाणी गेल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. डोंगर दऱ्याखोऱ्यातून आणि माळरान वेगवान पाण्याचा प्रवाह येथील नद्यांना मिळाल्याने अनेक ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे  सुधागडातील नद्या, नाले, धरणे दुथडी भरून वाहू लागले आहेत.

सुधागड पाली तहसीलदारांनी तालुक्यातील पुरस्थितिची पाहाणी करून नागरिकांनी सतर्कतेचे इशारा दिला आहे. पाली खोपोली मार्गावरील अंबा नदी पुलावरुन पाणी गेल्याने दोन्ही बाजुची वाहतूक अनेक तास खोळंबली होती. नवीन पुलाचे काम अपूर्ण असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना यांना त्रासाला सामोरे जावे लागले.

सुधागड तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा आणि रहदारी व वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या नांदगाव, भेरव पुलावरून देखील पाणी वाहू लागल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेजारील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा  

Back to top button