पुणे : जिल्हा असा झाला केरोसीनमुक्त | पुढारी

पुणे : जिल्हा असा झाला केरोसीनमुक्त

पुणे : पुणे शहर आणि हवेली तालुका केरोसीनमुक्त झाला. त्यानंतर ग्रामीण भागही केरोसीनमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले. आजअखेर संपूर्ण जिल्हा केरोसीनमुक्त झाला असून, घराघरांत घरगुती गॅसपुरवठा होत आहे.

जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये सात लाख 8 हजार 264 शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातील 81 हजार 60 शिधापत्रिका या केरोसीन घेण्यास पात्र होत्या. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत दोन लाख 83 हजार 707 लिटर केरोसीन वितरित करण्यात आले आहे. त्यानंतर जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतूनच केरोसीनची मागणी होत होती. इतर तालुक्यांतून मागणी होत नसल्याने बंद करण्यात आले. एप्रिल 2021 मध्ये केवळ आंबेगाव तालुक्यातून केरोसीनची मागणी झाली होती. त्यानुसार एक टँकर म्हणजेच बारा हजार लिटर केरोसीन तीन हजार 450 पात्र शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात आले. आता संपूर्ण जिल्हा केरोसीनमुक्त झाला आहे.

दिवाबत्तीसाठी केरोसीनचे वितरण
ग्रामीण भागात वीजपुरवठा झालेला नव्हता. त्यामुळे सवलतीच्या दरात केरोसीनचा पुरवठा केला जात होता. सध्या गावखेड्यातही वीजपुरवठा पोहचला असून, स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा पुरवठा होत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने केरोसीनचा पुरवठा बंद करण्यात आला.

जिल्ह्यातील गॅसपुरवठा होणारे कुटुंब
एक सिलिंडर ः
14 लाख 37 हजार 270
दोन सिलिंडर ः
22 लाख 51 हजार 202
एकूण ः
36 लाख 88 हजार 472

Back to top button