काली लघुचित्रपट निर्मातीविरोधात दिल्लीसह इतर ठिकाणी गुन्हे दाखल | पुढारी

काली लघुचित्रपट निर्मातीविरोधात दिल्लीसह इतर ठिकाणी गुन्हे दाखल

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : काली नावाच्या लघुचित्रपटाचे वादग्रस्त पोस्टर्स जारी झाल्यानंतर नवा वाद निर्माण झालाय. लघुचित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोस्टरवर काली मातेचा फोटो दिसत असून ती त्यात सिगारेट ओढताना दिसत आहे.

लीना मनिमेकलाई हिच्या लघुचित्रपटाच्या पोस्टर्सवरून सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लीनाविरोधात कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी लोक करीत आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने (सायबर क्राईम) लीनाविरोधात कलम १५३ ए आणि कलम २९५ ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

धर्म आणि जातीच्या आधारावर लोकांना भडकविणे तसेच धार्मिक भावनांना ठेच पोहोचविल्याचा आरोप लीनाच्या विरोधात ठेवण्यात आले आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी लीनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. २ जुलै रोजी लिनाने आपल्या चित्रपटाचे पोस्टर जारी केले होते.

हेही वाचा : 

Back to top button