पिंपरी : कट मारल्याच्या रागातून रिक्षाचालकाला लुटले | पुढारी

पिंपरी : कट मारल्याच्या रागातून रिक्षाचालकाला लुटले

 

पिंपरी : कट मारल्याच्या रागातून रिक्षाचालकाला लुटले. ही घटना शनिवारी रात्री घडली.राम दिवेश कुमार (26, रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत.

ते भाडे घेऊन माणगावातून जात असताना एका रिक्षाने त्यांना ओव्हरटेक केले आणि थांबवले. त्यानंतर राम यांना रिक्षाच्या खाली बोलाऊन तू मला कट का मारला, असे म्हणत फिर्यादीचा पाच हजारांचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला.

Back to top button