amruta khanvilkar : अमृताच्या नृत्याचा नवा व्हिडिओ, काय ती अदाकारी! | पुढारी

amruta khanvilkar : अमृताच्या नृत्याचा नवा व्हिडिओ, काय ती अदाकारी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमृता खानविलकरच्या (amruta khanvilkar) सुंदर नृत्यानं तिच्‍या चाहत्‍यांना अक्षरश: सर्वांना वेड लावलंय. अमृताच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने तिच्या नृत्याचा सुंदर व्हिडिओ शेअर केलाय. चंद्रमुखीमुळे अमृताची खूप चर्चा झाली. तिचे कष्ट, नृत्याची प्रॅक्टीस आणि तासनतास मेकअपसाठी बसण्याची सहनशीलता यामुळे चंद्रमुखीला चारचाँद लागले. आता तिचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (amruta khanvilkar)

पाऊस म्हणजे सर, पाऊस म्हणजे शिरशिरी, पाऊस म्हणजे आठवणी, आणि त्या आठवणींन मध्ये चिंब भिजून जणं अशी कॅप्शन लिहित अमृताने हा व्हिडिओ शेअर केला आहे. नऊवारीत अमृता खूप सुंदर दिसतेय. या व्हिडिओमध्ये तिच्या सुंदर अदा पाहायला मिळताहेत.

काळ्या रंगाची साडी आणि त्याला गोल्डन काठ, हातात लाल रंगाच्या बंगड्या, नाकात नथ, मोकळे केस असा पेहराव करून तिने आपल्या अदांचे सादरीकरण केले आहे.

यानंतर साडीतील दोन सुंदर फोटो तिने पोस्ट केले आहेत. सहजच अशी कॅप्शन देत तिने हे फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एकापेक्षा एक फोटो पाहायला मिळतात. त्यात आणखी काही सुंदर फोटोंमध्ये तिने साडी परिधान केलेली दिसते.

तिच्या या व्हिडिओवर भरभरबन कमेंट्स येत आहेत. Beauty queen super ki amuu diiii❤️❤️❤️❤️❤️, Dancing queen, Khup Sundar, Pretty girl 💕💕💕, ख़ूबसूरत 👏🙌❤️, Gorgeous Mermaid Princess 👑💃🧚‍♂️🧜👸🏻❤️🌹, लावणी म्हणजेच अमृता🙌😍🙌❤️ असे एकापेक्षा एक कमेंट्स अमृताला मिळत आहेत.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

Back to top button