Femina Miss India : ‘मिस इंडिया’चा किताब मिळवणारी सिनी शेट्टी कोण आहे?

sinny shetty
sinny shetty
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकची सौंदर्यवती सिनी शेट्टी (Femina Miss India) हिने यंदाच्या वर्षीचा फेमिना मिस इंडिया किताब आपल्या नावे केला आहे. मानाची मानली जाणारी मिस इंडिया स्पर्धेत मुळच्या कर्नाटकच्या सिनीला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२२ हा किताब देण्यात आला. जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अंतिम घोषणेवेळी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती की, यंदाची मिस इंडिया कोण होणार? तर अखेर तो क्षण आला आणि या दिमाखदार सोहळ्यामध्ये सिनी शेट्टीच्या नावाची घोषणा झाली. (Femina Miss India) या स्पर्धेत राजस्थानच्या रुबल शेखावत ही दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान हिला समाधान मानावं लागलं.

सिनी शेट्टी आहे तरी कोण?

२१ वर्षीय सिनी शेट्टी हिचा जन्म मुंबईत झाला. ती मुळची कर्नाटकची आहे. ती शिक्षणातही अग्रेसर आहे. अकाऊंटिंग आणि फायनान्स या क्षेत्रातून तिने पदवी घेतली आहे. सोबतचं तिने सीएफए (चार्टंर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट) म्हणूनही काम केलं आहे.
सिनीने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. तिने बालपणापासून या नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये परीक्षक म्हणून नेहा धुपिया, मलायका अरोरा, डिझायनर रोहित गांधी, राहुल खन्ना, डिनो मोरिया, क्रिकेटपटू मिताली राज, कोरिओग्राफर शामक दावर यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news