नाशिक : भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळले | पुढारी

नाशिक : भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळले

नाशिक : शहरातील भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. पहिल्या घटनेत शनिवारी (दि.२) रात्री भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंदाजे ५० वर्षीय पुरुष आढळून आला होता. या पुरुषाचे पोट फुगल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या घटनेत पंचवटीतील गणेशवाडी भाजी मार्केट परिसरात ४५ ते ५० वर्षीय पुरुषाचा रविवारी (दि.३) मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button