Madhuri Dixit : माधुरीचा आई बहिणींसह फोटो आला समोर

माधुरी दीक्षित आई-बहिणींसमवेत
माधुरी दीक्षित आई-बहिणींसमवेत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit ) लाखो दिवाने आहेत. तिच्या एका स्माईलसाठी चाहते प्रतीक्षा करत राहतात. तिच्या जीवनाशी संबंधित अपडेट जाणून घ्यायला ते उत्सुकही असतात. आता तिच्याशी संबंधित अशीच एक सुखद माहिती चाहत्यांसाठी आहे. तिचा एक दुर्मिळ फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये नेमकं आहे तरी काय पाहुया. (Madhuri Dixit )

माधुरी दीक्षितने रविवारी मदर्स डे निमित्त तिची आई स्नेहलता दीक्षित यांच्यासाठी एक कॅप्शन लिहिलीय. कॅप्शनमध्ये म्हटलंय- Happy Birthday, Aai! They say a mother is a daughter's bestfriend. They couldn't be any more right. From everything that you've done for me, the lessons that you've taught have been the biggest gift for me from you. I wish you only good health & happiness! ❤️.

#MothersDay #Mother #MotherLove #Motherhood #Maa.

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. पैकी पहिल्या फोटोमध्ये माधुरी दीक्षित, आई स्नेहलता आणि माधुरीचे पती डॉ. नेने दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये मध्यभागी आई आणि सभोवताली तिघी बहिणी दिसतात. यात माधुरीच्या दोन मोठ्या बहिणी दिसत असून तिघींनीही ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे. आई आणि मोठ्या बहिणींसह माधुरीचा हा दुर्मिळ फोटो इन्स्टाग्रामवर पहायला मिळत आहे. माधुरी चार भावंडांमध्ये सर्वात लहान असून दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे.

नेटफ्लिक्सच्या आगामी द फेम गेममधील माधुरी दीक्षित, मुस्कान जाफेरी आणि लक्षवीर सरन या कलाकारांच्या भूमिका असणार आहेत.

हेदेखील वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news