डेक्कन क्वीनचे छप्पर पडले | पुढारी

डेक्कन क्वीनचे छप्पर पडले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: नुकतेच नवे डबे बसविण्यात आलेल्या डेक्कन क्वीन रेल्वेतील स्वच्छतागृहातील छप्पर कोसळल्याची घटना सोमवारी घडली. यात सुदैवाने कोणालाही हानी झाली नसली, तरी या घटनेमुळे रेल्वेने डब्याचे काम दर्जाहीन केल्याचे उघड झाले आहे. पुणे-मुंबई-पुणे यादरम्यान धावणार्‍या डेक्कन क्वीन रेल्वेचा नुकताच वाढदिवस झाला.

त्यानंतर रेल्वे प्रशासनाने डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे पारंपरिक डबे काढून तिला एलएचबीचे वातानुकूलित डबे बसविण्यात आले. हे डबे चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार केले आहेत. त्यानंतर त्या डब्यांची तपासणी माझगाव डॉक येथे करून ते प्रवासासाठी योग्य असल्याचे सांगत मान्यताही दिली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे नवे डबे प्रवाशांच्या सेवेसाठी उतरविले.

Back to top button