सांगली : आ. बाबर यांनी राष्ट्रवादीवर खापर फोडू नये | पुढारी

सांगली : आ. बाबर यांनी राष्ट्रवादीवर खापर फोडू नये

सांगली : पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या वैयक्‍तिक महत्वाकांक्षा व पक्षाअतंर्गत कारणावरून त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा. त्याचे खापर त्यांनी राष्ट्रवादीच्या माथ्यावर फोडू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते.

ते म्हणाले, सध्याच्या राजकीय परस्थितीत शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आ. बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन बंड केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्यावर अन्याय केला जात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. वास्तविक पाहता पालकमंत्री म्हणून ना. जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन गेली अडीच वर्षे वाटचाल केली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आग्रहास्तव शिवसेनेला तीन जागा दिल्या.

त्यापैकी आ. बाबर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची समजूत घालून बिनविरोध निवडून दिले. जिल्हा नियोजन समितीत सेनेच्या सूचनेनुसार 3 सदस्य तसेच कार्यकारी समितीत आ. बाबर यांना संधी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात देखील अगदी जिल्हा परिषद सदस्यांपासून खासदारांपर्यंत सम व योग्य प्रमाणात निधीचे वाटप केले आहे.

तालुका समिती का स्थापन केली नाही राज्यपातळीवर ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्यास राष्ट्रवादीस 60, काँग्रेस व सेना प्रत्येक 40 टक्के जागा असे सूत्र ठरले होते. त्या प्रमाणे आम्ही इतर तालुक्यात समित्या स्थापन केल्या. मात्र त्यांच्या तालुक्यात त्यांनी समितीच स्थापन केली नाही. आम्ही समितीसाठी नावे मागितली तीही त्यांनी दिली नाहीत.

हेही वाचलंत का? 

Back to top button