मुलींची विक्री, मुलांचे शोषण, महिलांवर अत्याचार हाच तालिबान्यांचा खरा चेहरा : सहारा करीमी

सहारा करीमी
सहारा करीमी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्‍तानमधील चित्रपट दिग्दर्शिका सहारा करीमी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहून तालिबान्यांचा खरा चेहरा जगासमोर आणलाय. त्यांनी काय म्हटलंय पाहा.

सध्या जगातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे अफगानिस्तानमध्ये तालिबानचा ताबा. वीस वर्षांनतर तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे की आता महिलांचं काय होईल? अफगानिस्तानमध्ये तालिबानच्या विरोधात आणि महिलांच्या अधिकारांबद्दल बोलणारी सहारा करीमी कोण आहे? सहारा करीमी एक कलाकार, चित्रपट दिग्दर्शिका आहेत. त्या त्यांचा देश आणि देशवासियांसाठी संघर्ष करताना दिसत आहेत.

सहारा यांनी म्हटलं आहे की, तालिबानवर हे मौन मला समजतं नाहीये. असे म्हणत लोकांना आवाहन करणाऱ्या सहारा करीमीविषयी नक्कीच जाणून घ्यायला हवं.

सहारा करीमी आहे तरी कोण?

अफगाणिस्‍तानला ज्या गोष्टीची भीती होती. ती गोष्ट अखेर खरी ठरली. तालिबान्यांनी काबुलवर ताबा मिळवताच तब्बल २० वर्षांनंतर अफगाणिस्‍तानमध्ये पुन्हा तालिबान राज आला.

तालिबानने अफगानिस्तानवर कब्जा केला खरा. पण, एक अशी व्यक्ती आहे, तिने तालिबानशी पंगा घेतला आहे. ती व्यक्ती चित्रपट दिग्दर्शिका सहारा होय.

महिलांच्या अधिकारासाठी आवाज उठवणाऱ्या सहारा नूरी पिक्चर्स (Noori Pictures) मध्ये स्क्रिप्ट रायटर आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत. त्या Afghan Film च्या जनरल डायरेक्टरदेखील आहेत. त्यांनी जगभरात चित्रपट निर्माते आणि कलाकारांना आवाहन केलं आहे की, त्यांनी लिहिलेली पोस्ट जास्तीत जास्त शेअर व्हावी.

त्यांनी अफगाणमधील महिलांना वाचवण्यासाठी जी मोहीम सुरू केली आहे. ती मोहीम तालिबान्य़ांना घाबरून त्यांनी थांबवलेली नाही.

जगाचं मौन, सहारा म्हणतात…

तालिबान्‍यांना घाबरून सहारा मागे हटल्या नाहीत. त्या आपला आवाज आणखी दृढ करत आहेत. त्यांनी फेसबुकवर एक नोट लिहिली आहे. त्याला कॅप्शन दिलीय की, 'मी एक पत्र लिहून काल रात्री शेअर केले आहे. जगाला आपल्याबद्दल माहिती असावी; जगाने आपल्याकडे पाठ फिरवू नये.'

सहारा यांनी पोस्टमध्ये लिहिलंय

सहारा या अफगाण फिल्म ऑर्गनायझेशनच्या महिला चेअरपर्सन आहेत. त्यांनी १३ ऑगस्टला ट्विटरवर ओपन लेटर लिहिलंय. यामध्ये त्यांनी अफगानिस्तानात होत असलेल्या अत्याचारांचा उल्लेख केला आहे. त्यांनी हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.

तालिबान्यांचा क्रूर चेहरा..

सहारा यांनी पत्रामध्ये लिहिलंय – माझं नाव सहारा करीमी आहे. मी एक चित्रपट दिग्दर्शिका आहे. अफगान चित्रपटाची सध्याची महासंचालक आहे. जी १९६८ मध्ये स्थापना झालेली एकमेव सरकारी मालकीची चित्रपट कंपनी आहे.

'मी तुटलेल्या मनाने लिहित आहे. ही अपेक्षा ठेवून की, माझ्या सुंदर लोकांनो, विशेषकरून फिल्ममेकर्सना तालिबान्यांपासून वाचवण्यासाठी सहभागी व्हा.

तालिबानने मागील काही आठवड्यांमध्ये अनेक प्रांतांवर कब्जा केला आहे. त्यांनी आमच्या लोकांचा नरसंहार केला आहे. अनेक मुलांचे अपहरण केलं आहे.

अनेक मुलींना चाईल्ड ब्राईडच्या रूपात विक्री केली आहे. एका महिलेची हत्या त्यांनी तिच्या कपड्यांसाठी केली.

त्यांनी पुढे लिहिलंय की, त्यांनी आमच्या आवडत्या हास्य कलाकारांपैकी एकाला त्रास देऊन मारून टाकलं. त्यांनी एका कवीला मारून टाकलं. त्यांनी शासनाच्‍या संस्कृती आणि मीडिया हेडला मारलं. सरकारशी जोड़ले गेलेल्या लोकांना मारलं. त्यांनी काही लोकांना सार्वजनिकपणे फाशीवर लटकवलं. त्यांनी लाखो कुटुंबे विस्थापित केली.

सहारा करीमी
सहारा करीमी

प्रांतातून पळून गेल्यानंतर, कुटुंबे काबुलमध्ये छावण्यात आहेत. तिथे त्यांची दुरवस्था झाली आहे. या छावण्यांमध्ये लूट सुरू आहे. दुधाअभावी मुले मरत आहेत. हे एक मानवतावादी संकट आहे. तरीही जग शांत आहे.

आम्हाला या मौनाची सवय आहे, पण आम्हाला माहित आहे की ते योग्य नाही. २० वर्षात आम्ही जे साध्य केले ते आता वाया जात आहे. आम्हाला तुमचा आवाज हवा आहे.

माझ्या देशात एक चित्रपट निर्माता म्हणून मी खूप मेहनत घेतली आहे. ती संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

तालिबानने सत्ता काबीज केली तर ते सर्व कलांवर बंदी घालतील. मी आणि इतर चित्रपट निर्माते त्याच्या हिटलिस्टवर असू शकतो. ते महिलांच्या अधिकारांचे उल्लंघन करतील . आमच्या अभिव्यक्तीचे मौनात रुपांतर होईल.

सहारा करीमी यांनी लिहिले की 'तालिबानची सत्ता असताना शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या शून्य होती. पण, त्यानंतर शाळेत नऊ दशलक्षाहून अधिक अफगाण मुली आहेत.

हेरात, तालिबानने जिंकलेले तिसरे सर्वात मोठे शहर आहे. येथील विद्यापीठात ५०% महिला होत्या. हे जगाला माहित नाही. या काही आठवड्यांत तालिबान्यांनी अनेक शाळा उद्ध्वस्त केल्या आणि २० लाख मुलींना पुन्हा शाळेतून काढून टाकले.

सहारा यांनी पुढे लिहिलंय, 'मला हे जग मला समजत नाहीये. हे मौन मला कळत नाहीये. मी उभी आहे. आणि माझ्या देशासाठी लढतेय. परंतु, मी नाही करू शकत. मला तुमच्यासारख्या सहकाऱ्यांची गरज आहे.

कृपया आमच्याबरोबर काय घडत आहे, हे पाहण्यासाठी आमची मदत करा. अफगाणिस्‍तानमध्‍ये काय सुरू आहे. कृपया तुमच्या देशातील मीडियाला सूचित करून आमची मदद करा.'

हे सत्य तुमच्या माध्यमांसोबत शेअर करा. तुमच्या सोशल मीडियावर आमच्याबद्दल लिहा. जग आपल्याकडे बघत नाही. आम्हाला अफगाण महिला, मुले, कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांच्या वतीने तुमचा पाठिंबा आणि आवाज हवा आहे. आत्ता आम्हाला सर्वात मोठी मदत हवी आहे.

कृपया आम्हाला मदत करा. अफगाणिस्तानमधील नागरिकांना  सोडू नका. काबुलमध्ये तालिबानची सत्ता येण्यापूर्वी कृपया आम्हाला मदत करा. आमच्याकडे फक्त काही दिवस आहेत. खूप खूप धन्यवाद.'

अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट

दरम्यान, हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सहारा यांची ही नोट स्वत:च्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही पोस्ट अधिकाधिक शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

हेदेखील वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news