वर्ल्ड फोटोग्राफी डे का साजरा करतात.. | पुढारी

वर्ल्ड फोटोग्राफी डे का साजरा करतात..

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फोटो वर्तमानातील क्षण टिपतो आणि भूतकाळातील आठवांच्‍या घरात जातो.  काळाबरोबर प्रचंड वेगाने बदलेल्‍या आधुनिक  तंत्रज्ञानाने फोटोग्राफी चे रुपच पालटलं आहे. एकेकाळी भिंतीवर असणारे आठवातील फोटो आता तुमच्‍या स्‍मार्ट फोनमध्‍ये असतात. आज वर्ल्ड फोटोग्राफी डे  निमित्त जाणून घेवू या फोटोग्राफीचा हा रंजक प्रवास …

वर्ल्ड फोटोग्राफी डे का साजरा केला जातो ?

हजारो शब्द सांगू शकत नाहीत ते एक समर्पक फोटो सहजपणे सांगून जातो . एका निर्जीव दृश्यामागील सजीवता, त्याची दाहकता समाेर आणताे.

१९ ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणून साजरा केला जातो.

१८ ऑगस्ट १९३९ रोजी फ्रेंच सरकारने फोगोग्राफीचे पेंटट विकत घेतले. जोसेफ निकफेर निएपेस यांनी पहिला फोटो काढल्याचे सांगितले जाते.

संपूर्ण जगभरात फोटोग्राफीला प्रोत्‍साहन मिळावे, तसेच जगातील विविधता
फोटोच्‍या माध्‍यमातून समोर यावी हा या दिनाचेउद्‍देश आहे.

फोटोग्राफी छंदाचा उत्‍सव साजरा करणारा हा दिवस आहे. सर्वजण सोशल मीडियावर सक्रीय असतात त्‍यामुळे यंदा वर्ल्ड फोटोग्राफी डे चे आयोजन इंस्‍टाग्रामवर करण्‍याची घोषणा आयोजकांनी केली होती. या दिनानिमित्त सेल्‍फी घ्‍या आणि त्‍या इंस्‍टाग्राम शेअर करा, प्रतिकिृया द्‍या आणि फोटोग्राफीचा उत्‍सव साजरा करा, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

यंदाची थीम…

वर्ल्ड फोटोग्राफी डे वेबसाइटच्‍या माहितीनुसार, यंदा १० लाख हॅशटॅगचे उदिष्‍ट्य ठेवण्‍यात आले आहे.

आतापर्यंत ६ लाखांचे उदिष्‍ट्य साध्‍य करण्‍यात आले आहे. या हॅशटॅगचा वापर करुन सर्वोत्‍कृष्‍ट फोटो इंस्‍टाग्रामवर शेअर करावेत. त्‍याचबरोबर अन्‍य फोटोजला लाइक आणि शेअर करावे असेही आवाहन करण्‍यात आले आहे.

सलग दुसर्‍या वर्षी कोरोना महामारीच्‍या काळात फोटोग्राफी डे साजरा होत आहे. त्‍यामुळे यंदाची थीम ही ‘कॅमेरा लेन्‍सच्‍या माध्‍यमातून महामारीचे लॉकडाउन’ अशी आहे.

जगातील पहिला सेल्फी

आजच्‍या सेल्‍फी हा जगण्‍यातील भाग झाला आहे: पण तुम्हाला माहीत आहे का? जगातील पहिला सेल्फी कोणी काढला, अमेरीकेच्‍या रॉबर्ट कॉर्नेलियस याने जगातील पहिला सेल्फी काढला असे मानले जाते.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ :  डिंपल को सिम्पल नहीं समझनेका ! देवमाणूस फेम अस्मिता देशमुख बरोबर खास गप्पा !

Back to top button