अफगाणिस्‍तानचे माजी राष्‍ट्रपती अशरफ घनी ‘युएई’त आश्रयाला

अफगाणिस्‍तानचे माजी राष्‍ट्रपती अशरफ घनी यांनी कुटुंबासह  'युएई'त आश्रय घेतला आहे.
अफगाणिस्‍तानचे माजी राष्‍ट्रपती अशरफ घनी यांनी कुटुंबासह 'युएई'त आश्रय घेतला आहे.
Published on
Updated on

अबू धाबी ; पुढारी ऑनलाईन: तालिबानने सत्ता काबीज केल्‍यानंतर अफगाणिस्‍तानमधून पलायन केलेले माजी राष्‍ट्रपती अशरफ घनी यांनी संयुक्‍त अरब अमीरात (युएई)मध्‍ये आश्रय घेतला आहे. मानवतेच्‍या दृष्‍टीकोनातून माजी राष्‍ट्रपती अशरफ घनी यांना आश्रय दिला असल्‍याचे 'युएई'चे परराष्‍ट्र मंत्रालयाने म्‍हटले आहे.

रविवार (दि. १५) रोजी अफगाणिस्‍तानमध्‍ये घनी यांचे सरकार कोसळले होते. तालिबानने सत्ता काबीज केल्‍यानंतर घनी यांनी देश सोडून पलायन केले.

सध्‍या त्‍यांचे कुटुंबासह वास्‍तव्‍य अबू धाबीमध्‍ये असल्‍याचे समजते. मात्र शहरातील कोणत्‍या भागात त्‍यांनी आश्रय घेतला आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही.

यासंदर्भात 'युएई'ने म्‍हटले आहे की, ७२ वर्षीय अशरफ घनी आणि त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍यांचे मानवेतच्‍या दृष्‍टिकोन आम्‍ही आमच्‍या देशात स्‍वागत केले आहे.

हेलिकॉप्‍टर भरल्‍यानंतर नोटाच्‍या बॅग धावपट्‍टीवर टाकूनच पलायन

चार कार भरुन नोटा घेवून घनी यांनी हेलिकॉप्‍टरमधून पलायन केले आहे, असे वृत्त रशियाच्‍य वृत्तसंस्‍थेने दिले होते.

हेलिकॉप्‍टर नोटांनी तुडूंब भरल्‍यानंतर नोटांनी भरलेल्‍या काही बॅग धावपट्‍टीवरच टाकण्‍यात आल्‍या होत्‍या, अशीही माहिती रशियाच्‍या दुतावासातील कर्मचार्‍यांनी हवाल्‍याने देण्‍यात आली हाेती.

अर्थशास्‍त्राचे अभ्‍यासक असणारे घनी हे अफगाणिस्‍तानचे १४ वे राष्‍ट्रपती आहेत. २० सप्‍टेंबर २०१४ रोजी ते प्रथम राष्‍ट्रपती झाले.

यानंतर २८ सप्‍टेंबर २०१९ रोजी झालेल्‍या राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

१९९६ ते २००१ या कालावधीमध्‍ये अफगाणिस्‍तानमध्‍ये तालिबानाचे राज्‍य होते. ११ सप्‍टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहतवादी हल्‍ला झाल्‍यानंतर अमेरिकेने तालिबान्‍याविरोधात कठोर कारवाई केली होती.

हेही वाचलं का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news