Vedang Raina : कोण आहे वेदांग रैना, ज्याच्यावर श्वेता तिवारीच्या मुलीचा जडलाय जीव

vedang raina
vedang raina
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटरनेट सेंसेशन पलक तिवारी आपल्या ग्लॅमरस लुक्स शिवाय अफेयर्समुळे चर्चेत राहते. पलकचं नाव आधी इब्राहिम अली खान सोबत जोडलं जात होतं. पण, लेटेस्ट रिपोर्टनुसार, पलक हिने इब्राहिमला नाही तर जोया अख्तर फिल्म द आर्चीजचा स्टार वेदांग रैनाला डेट करत आहे. (Vedang Raina:) जेव्हापासून हे वृत्त समोर आले आहे, तेव्हापासून प्रत्येक जण हेच सर्च करत आहे की, वेदांग रैना कौन है? (Vedang Raina:)

वेदांग रैना नेमकं कोण आहे, ज्याच्या स्माईलवर आणि किलर लुक्सवर तरुणी फिदा झाले आहेत. वेदांग रैना न्यूकमर आहे. तो जोया अख्तरचा मचअवेटेड प्रोजेक्ट द आर्चीजमधून बॉलीवूड डेब्यू करत आहे. द आर्चीजच्या पहिल्या टीझर व्हिडिओमध्ये तुम्ही वेदांगची झलक पाहिली असेलच. यात त्याचा किलर दिसतोय हे पाहून तुमचीही तारांबळ उडाली असेल. वेदांग या चित्रपटात आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावण्यासाठी सज्ज झाला आहे.

वेदांग केवळ एक चांगला अभिनेताच नाही तर गायक आणि मॉडेलदेखील आहे. तो मुंबईचा रहिवासी आहे. जमनाबाई नरसी शाळेतून त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी आपले कॉलेज नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीजमधून केले.

वेदांगने गायक म्हणून करिअरची सुरुवात केली. खालिद टाक, द वीकेंड्स अर्नड इट यांसारख्या अनेक कव्हरसाठी त्याने परफॉर्म केले आहे. त्याच्या सुरेल आवाजासाठी त्याला लोकांचे खूप प्रेम मिळाले आहे. काका चंदन रैना यांच्याकडून त्याला गाण्याची प्रेरणा मिळालीय.

वेदांगचे इन्स्टा अकाउंट पाहून ते नवीन असल्याचे समजते. त्याच्या टाईमलाईनवर फक्त १२ पोस्ट आहेत. वेदांगचे १६.४k फॉलोअर्स आहेत. वेदांगच्या इन्स्टावरील फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की, एक नवीन हँडसम हंक बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. वेदांग त्याच्या स्मार्ट लुक्सने इतर बॉलीवूड स्टार किड्सना टक्कर देतो.

ही गोष्ट होती वेदांगाची. आता वेदांग आणि पलकच्या प्रेमकथेबद्दलही बोलूया. एका इंग्रजी वेबसाईटनुसार रिपोर्टनुसार, वेदांग आणि पलक गेल्या २ वर्षांपासून गुप्तपणे डेटिंग करत आहेत. वेदांग आणि का यांची पहिली भेट एका पार्टीत झाली होती.

पलक आणि वेदांग यांची भेट एकाच एजन्सीच्या पार्टीत झाली. तेव्हापासून ते एकमेकांना ओळखतात आणि डेट करत आहेत. मुलगी पलकच्या निवडीमुळे तिची आई श्वेता तिवारी खूप खूश असल्याचं ऐकायला मिळतंय. अफेअरच्या बातम्यांवर पलक आणि वेदांगकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vedang Raina (@vedangraina)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vedang Raina (@vedangraina)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news