नाशिक मनपा : प्रभाग रचना याचिकेवर सोमवारी सुनावणी | पुढारी

नाशिक मनपा : प्रभाग रचना याचिकेवर सोमवारी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोन याचिकांवर सोमवारी (दि.27) सुनावणी होणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेबाबत घेण्यात आलेल्या हरकतींवर कोणत्याही प्रकारची दखल घेतली न गेल्याने कौस्तुभ परांजपे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यास अहवाल सादर करा, असे आदेश दिले होते. त्यानंतर सुनावणी टळली होती.

तसेच प्रभाग क्रमांक 44 बाबतदेखील एक याचिका दाखल झाली आहे. त्याविषयी राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली असून, दोन्ही याचिकांवर सोमवारी (दि.27) सुनावणी होईल.

हेही वाचा :

Back to top button