

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉट बेली डान्सर नोरा फतेही (Nora fatehi) तिच्या लूक आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. तिचा कोणताही लूक असो तो लगेच व्हायरल होतो. तिचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर खूप शेअर केला जातो. आता नुकताच नोरा फतेहीचा ऑरेंज कलर ड्रेस लुक चांगलाच व्हायरल होतोय. (Nora fatehi)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या नोरा फतेहीच्या व्हिडिओमध्ये तिने ऑरेंज रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. नोराने तिचे केस बांधले आणि तिचा लूक पूर्ण करण्यासाठी लाल हिल्स घातली. नोराच्या लूकमध्ये तिच्या ईअरिंग्ज आणि लिपस्टिकने आणखी भर घातली आहे. नोराचा हा व्हिडीओ viral bhayani इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे.
नोराच्या व्हिडीओवर बरीच टीका केली जात आहे. नोरा फतेहीच्या या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये लोक तिला 'हॉट चिली' म्हणत आहेत. एका यूजरने गॉर्जियस म्हणत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. दुसऱ्या युजरने ब्युटिफुल म्हणत हार्ट इमोजी शेअर केलीय. पण, नोराचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक अजय देवगणलाही ट्रोल करत आहेत.
नोरा ज्या ठिकाणी उभी आहे त्याच्या मागे भिंतीवर गुटख्याच्या पिचकाऱ्याच्या खुणा आहेत. या खुणा पाहून लोकांनी अजय देवगणला ट्रोल करायला सुरुवात केली. खरंतर अजय देवगण एका पान मसाला कंपनीची जाहिरात करतो. या जाहिरातीवरून लोकांनी त्याला यापूर्वीही खूप ट्रोल केले होते. एक व्यक्ती कमेंट करताना लिहिते- 'अज देवगणने भिंत रंगवली आहे', तर दुसरी व्यक्ती लिहिते, 'कुणी मागे वळून बघा, अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान आले असतील.
नोरा अलीकडेच एका डान्स शोला जज करत आहे. तिचे जॅक नाइटसोबत एक गाणेही आणले आहे. त्या गाण्याला लोकांचे खूप प्रेम मिळाले आहे. हा व्हिडीओ गाण्यातील नोरा फतेहीचा लूकही प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.
हेदेखील वाचा-
video – viralbhayani वरून साभार