निक अँड एमएम! | पुढारी

निक अँड एमएम!

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची लाडकी कन्या मालती मेरीचा एक फोटो आता या दोघांनी सोशल मीडियात शेअर केला आहे. ‘फादर्स डे’निमित्त शेअर केलेल्या या फोटोत निकने लेकीला धरून जणू काही तिला चालवत असल्यासारखी पोझ दिली आहे. तिच्या पायाखाली ‘एम एम’ (तिचे टोपण नाव) असे लिहिलेले चिमुकले बूट असून, निकच्या पायात ‘एम एम्स डॅड’ असे लिहिलेले बूट आहेत.

प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, फादर्स डेच्या शुभेच्छा! आपल्या लहान मुलीसोबत तुला पाहणं अतिशय आनंददायक आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि पुढेही ते असेच बहरत राहो!’ निकनेही हा फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर करून म्हटले आहे, ‘माझ्या मुलीसोबत पहिला फादर्स डे. धन्यवाद प्रियांका या शूजसाठी आणि मला बाबा होण्याचा आनंद देण्यासाठी. आय लव्ह यू, फादर्स डेच्या सर्वांना शुभेच्छा!’

Back to top button