HBD Thalapathy Vijay : ‘या’ ५ बॉलिवूड अभिनेत्रींनीसोबत विजयचा रोमान्स

vijay thalapathy and bipasha basu
vijay thalapathy and bipasha basu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार थलपथी विजय (HBD Thalapathy Vijay ) २२ जून, २०२२ रोजी त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तुम्हाला माहितीये का, प्रियांका चोप्रा ते कॅटरिना कैफ यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींनीही त्याच्यासोबत काम केले आहे. इतकेच नाही तर प्रियांका चोप्रा ते बिपाशा बसू अशा अनेक अभिनेत्रींनी थलपती विजय या चित्रपटातून पदार्पण केले. (HBD Thalapathy Vijay )

साऊथ सुपरस्टार थलपथी विजयला कोण ओळखत नाही. तो केवळ दक्षिणेचाच नाही तर संपूर्ण जगाचा सुपरस्टार आहे, जो त्याच्या दमदार अभिनयासाठी आणि सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचे करोडो चाहते आहेत जे त्याची एक झलक पाहायला तयार होतात. २२ जून, १९७६ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे जन्मलेले जोसेफ विजय चंद्रशेखरचे आज करोडो फॅन्स आहेत.

दिग्गज अभिनेते रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त फी घेण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. यावरून तुम्ही त्याच्या स्वॅगचा अंदाज लावू शकता. 'थलपथी ६५'साठी तो १०० कोटी रुपये घेतले आहे. विजयने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली असली तरी अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट 'नलैया थेरपू' होता. या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव विजय होते आणि त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये विजयची भूमिका साकारताना दिसला.

थलापथी विजयने वयाची चाळीशी गाठली असली तरी तो एखाद्या तरुण अभिनेत्याला मागे टाकेल, असा अभिनेता आहे. त्याने प्रियांका चोप्रा ते कॅटरिना कैफपर्यंत बॉलीवूड अभिनेत्रींसोबत काम केले आहे.

थलापथी विजय आणि प्रियांका चोप्राचा चित्रपट

प्रियांका चोप्राने आपल्या करिअरची सुरुवात विजय या चित्रपटातून केली होती. प्रियांका चोप्रा २००२ मध्ये थलपथी विजयच्या थमिझन चित्रपटातही दिसली होती.

कॅटरिना कैफ आणि थलापथी

विजयसोबत कॅटरिनाने चित्रपटात नाही तर एका जाहिरातीसाठी एकत्र काम केले आहे. या दोघांना जाहिरातीत एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. पण, दोघांनी कधीही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही.

बिपाशा बसू आणि थलापथी विजय चित्रपट

बिपाशा बसूने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण विशेष बाब म्हणजे प्रियांका चोप्राप्रमाणेच बिपाशा बसूनेही थलापथी विजय या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २००५ मध्ये बिपाशाने विजयसोबत सचिन चित्रपटात काम केले होते.

अमिषा पटेल-विजय थलापथी

अमिषा पटेलने विजय थलापथी यांच्या पुधिया गीताई या चित्रपटाद्वारे तमिळमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन केपी जगन यांनी केले होते.

जेनेलिया डिसोझा-विजय थलापथी

२००५ मध्ये आलेल्या सचिन या चित्रपटात थलापथी विजय आणि बिपाशासोबत जेनेलिया डिसूजा देखील मुख्य भूमिकेत होती. विजयसोबत जेनेलियाचे अनेक सीन्स होते आणि दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते.

थलपथी विजय आणि ईशा कोप्पीकर यांचा चित्रपट

१९९९ मध्ये सुपरहिट चित्रपट नेंजिनीलेमध्ये ईशा आणि विजयची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटातील गाण्यांनाही चांगलीच पसंती मिळाली होती. थलपथी विजयनेच या चित्रपटासाठी ईशाचे नाव निर्मात्यांना सुचविल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news