Swathi Sathish : या अभिनेत्रीला रूट कॅनाल सर्जरी करणं पडलं महागात, चेहरा इतका बिघडला की... | पुढारी

Swathi Sathish : या अभिनेत्रीला रूट कॅनाल सर्जरी करणं पडलं महागात, चेहरा इतका बिघडला की...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री स्वाती सतीश (Swathi Sathish ) हिला एक सर्जरी करणं महागात पडलं आहे. एका चुकीच्या सर्जरीमुळे तिचा चेहरा इतका बिघडलाय की, तिला घराबाहेर पडणेही कठीण झालं आहे. आपण सुंदर दिसावं, असं प्रत्येकालाचं वाटत असते. खासकरून, अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी काय काय करतात. यामध्ये प्लास्टिक सर्जरी, दातांची शस्त्रक्रिया, हेअर सर्जरी अशा काही शस्त्रक्रियांचा भाग असतो. पण, काही वेळा चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे नुकसान झालेले दिसते. काहींची सर्जरी यशस्वी ठरते तर काहींना चुकीच्या सर्जरीमुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. अशीच घटना अभिनेत्री स्वाती सतिश हिच्यासोबत घडलीय.

स्वातीच्या चेहऱ्यावर झालेल्या चुकीच्या सर्जरीमुळे तिचा चेहरा बिघडलाय, ही घटना उघडकीस आल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. स्वाती सतीश हिने नुकतीच रूट कॅनल सर्जरी केली होती. मात्र आता चुकीच्या सर्जरीमुळे तिचा चेहरा इतका बदलला आहे की तिला घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. (Swathi Sathish )

स्वातीचे पूर्वीचे आणि सर्जरी झौल्यानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिचा चेहरा बिघडलेला दिसतो. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर सूज दिसत आहे. तसेच ओठही ओबडधोबड झालेले दिसत आहेत. गालाचा भागही प्रचंड सुजलेला दिसतो. मीडिया रिपोर्टनुसार, स्वातीने बंगळुरूमध्ये रूट कॅनल सर्जरी केली होती. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर सूज आली. डॉक्टरांनी तिला सांगितले की, ही सूज दोन-तीन दिवसांत कमी होईल. पण, तसे झाले नाही. तीन आठवडे झाल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावरील सूज कमी होत नाहीये.

त्यामुळे स्वातीने यासाठी डॉक्टरांना जबाबदार ठरवलं आहे. स्वातीच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेवेळी तिला ऍनेस्थेशियाच्या ऐवजी सॅलिसिलिक अॅसिड देण्यात आलं. जेव्हा तिला याबद्दल कळालं तेव्हा तिने दावाखान्यात जाऊन सगळ्यांना विचारणा केली. पण आता तिची झालेली अवस्था पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. आता तिचा चेहरा पूर्ववत व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

Back to top button