संतापजनक : पाकिस्‍तानमधील हाॅटेल मालक ग्राहकांना आकर्षित करण्‍यासाठी दाखवताेय आलिया भट्टचा ‘तो’ सीन | पुढारी

संतापजनक : पाकिस्‍तानमधील हाॅटेल मालक ग्राहकांना आकर्षित करण्‍यासाठी दाखवताेय आलिया भट्टचा 'तो' सीन

पुढारी ऑनलाईन डेस्क : जाहिरात करण्यासाठी कोण काेणता फंडा वापरेल हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार पाकिस्तान येथील कराचीमधील रेस्टॉरंन्टमध्ये घडला आहे. यात रेस्टॉरंन्टबाहेर ग्राहकांना आकर्षित करून यात बोलवण्यासाठी चक्क बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाड’ या चित्रपटातील एक सीन दाखविण्यात आला आहे. याच दरम्यान रेस्टॉरंन्टमध्ये पुरूष ग्राहकांना २५ टक्के सूटदेखील देण्यात आली. मात्र, सध्या हे रेस्टॉरंन्ट  जोरदार ट्रोलिंगचा सामना करत आहे. ‘अगदी खालच्या दर्जाची जाहिरात आहे’, ‘रेस्टॉरंन्टच्या जाहिरातीसाठी जर तुम्ही याचा वापर करत असाल तर हे चुकीचं आहे.’ अशा शब्‍दात नेटकरी त्‍याचा समाचार घेत आहेत.

अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात खूपच गाजला. या चित्रपटात गंगूबाई म्हणजे, आलिया आपल्या ग्राहकांना बोलावत असल्याचे एका सीन दाखविण्यात आला आहे. याच सीनचा वापर करून पाकिस्तान येथील कराचीमध्ये रेस्टॉरंन्टमध्ये त्याच्या ग्राहकांना आकर्षित करण्यात येतं आहे. याच दरम्यान रेस्टॉरंन्टच्या आतमध्ये येणाऱ्या पुरूष ग्राहकांना २५ टक्क्याची सूटदेखील देण्यात येत आली आहे.

याबाबतचे रेस्टॉरंन्टवर एक भले मोठे पोस्टर लावले आहे. ‘आजा ना राजा, अजून कशासाठी वाट पाहतो? अशी टॅगलाईन दिली आहे. पुरूषांना २५ टक्के सवलत असल्‍याची ऑफर ‘मेन्स मंडे’ अंतर्गत देण्यात आली आहे. या रेस्टॉरंन्टच्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर मात्र, रेस्टॉरंन्टच्या मालकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी रेस्टॉरंन्ट आणि पाकिस्तान सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यात नेटकऱ्यांनी ‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटामधील सीन जाहिरातीसाठी वापरणं अपमानास्पद आहे’, ‘अगदी खालच्या दर्जाची जाहिरात आहे’, ‘रेस्टॉरंन्टच्या जाहिरातीसाठी जर तुम्ही याचा वापर करत असाल तर हे चुकीचं आहे.’ असे म्हणत ट्रोल केलं आहे.

याच दरम्यान रेस्टॉरंन्टकडून यावर कोणत्याच प्रकारची माफी मागितली गेली नाही. तर त्यांनी एक पोस्ट शेअर करून हे स्वत: चेच कौतुक केले आहे. यात त्यांनी ‘कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. ही फक्त एक कल्पना आहे.’ असे म्हटले आहे. यामुळे या रेस्टॉरंन्टविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

(video : swing.khi instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Swing 🌸 (@swing.khi)

Back to top button