Shamshera Poster leak : 'शमशेरा'चे पोस्टर लीक, रणबीरला पाहून विश्वास नाही बसणार | पुढारी

Shamshera Poster leak : 'शमशेरा'चे पोस्टर लीक, रणबीरला पाहून विश्वास नाही बसणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि आता त्याचा आगामी चित्रपट ‘शमशेरा’नेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.  (Shamshera Poster leak)या चित्रपटाचे पोस्टर लीक झाले आहे . तुम्हाला विश्वास बसणार नाही की, या पोस्टरवर रणबीर कपूरचा लूक आहे. तुम्ही रणबीरला या अवतारात याआधी कधीही पाहिले नसेल. पोस्टर समोर येताच, #शमशेरा ट्विटरवर ट्रेंड करू लागला. रणबीरचा हा लूक पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंट करायला सुरुवात केलीय. (Shamshera Poster leak)

रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाचीही चाहते खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यासाठी त्याने खूप दिवस आधी शूटिंग केले होते, पण या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आली नव्हती. आता जेव्हा ‘शमशेरा’चे पोस्टर सोशल मीडियावर लीक झाले तेव्हा रणबीरचा लूक पाहून सगळेच थक्क झाले.

‘शमशेरा’चे पोस्टर व्हायरल

‘शमशेरा’च्या लीक झालेल्या पोस्टरमध्ये रणबीर कपूरच्या लूकबद्दल सांगायचे तर, तो लांब दाढी आणि मिशामध्ये जबरदस्त दिसत आहे. त्याच्या कपाळावर जखमेच्या खुणा आहेत. त्याचे केस वाऱ्याने उडत आहेत आणि हातात कुऱ्हाड धरलेल्या रणबीरच्या चेहऱ्यावर क्रोध दिसत आहे.

हे लीक झालेले पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पाडलाय. काही जण रणबीर मिशनवर असल्याचे सांगत आहेत तर काही जण ही दंतकथा असल्याचे सांगत आहेत.

चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार!

या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे. हा चित्रपट यावर्षी २२ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. तथापि, निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

‘ब्रह्मास्त्र’ ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे

रणबीर कपूरचा बिग बजेट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या धमाकेदार ट्रेलरमध्ये असे व्हीएफएक्स सीन्स दाखवण्यात आले होते, जे हॉलिवूड चित्रपटांच्या सीन्सलाही मागे टाकणारे आहे. यात आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

 

Back to top button