WhatsApp Latest Update : व्हॉट्स अ‍ॅपने ग्रुप कॉलमध्ये अ‍ॅड केले 'हे' नवीन फीचर | पुढारी

WhatsApp Latest Update : व्हॉट्स अ‍ॅपने ग्रुप कॉलमध्ये अ‍ॅड केले 'हे' नवीन फीचर

पुढारी ऑनलाईन डेस्क: 
व्हॉट्स अ‍ॅप (Whats App) वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर घेऊन येत असते. सध्या व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp Latest Update) ग्रुप कॉलवर काही नवीन अपडेट्स जोडले आहेत, जे आपल्याला यापूर्वी गुगल मीट आणि झूमवर पाहायला मिळत होते. या नवीन फीचरनुसार आता व्हॉट्स अ‍ॅप कॉलदरम्यान ग्रुपमधील सदस्यांना म्यूट करणे, ग्रुपमधील ठराविक सदस्यांना मेसेज पाठवणे आणि कोणीही ऑफस्क्रीनमध्ये सहभागी झाल्यास, त्याचे बॅनर पाहणे हे नवीन फीचर व्हॉट्स अ‍ॅपने (WhatsApp) अपडेट केले आहे.

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा (WhatsApp)  वापर करून युजर्सला त्याच्यासाठी महत्त्‍वाच्‍या असलेल्या व्यक्ती, कुटुंबीय किंवा सहकारी, यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी अधिक मदत होते. ग्रुप चॅट्स वापरून युजर्स एकावेळी २५६ व्यक्तींबरोबर मेसेजेस, फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकतो. अशा ग्रुपला युजर्स आपल्या आवडीचे नाव देखील देऊ शकतात. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवरील (WhatsApp) कॉलिंग हे एक भन्नाट फीचर आहे.

यापूर्वी व्हॉट्स अ‍ॅपने (WhatsApp Lates Update) युजर्ससाठी त्याच्या पर्सनल गोष्टी गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी My contacts except…हे फीचर आणले आहे. यामध्ये इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपसाठी युजर्सला त्याचा प्रोफाईल फोटो, स्टेट्स अपडेट, साल्ट सीन आणि इतर काही माहिती गोपनीय ठेवता येत होती.

यापूर्वी व्हॉट्स अ‍ॅपने केले होते हे अपडेट

व्हॉटस ग्रुपमध्ये २५६ इतक्याच सदस्यांना सहभागी करून घेता येत होते; पण व्हॉटसअप ग्रुपमध्ये (WhatsApp Lates Update) आता ५१२ सदस्यांना सहभागी करून घेता येणार आहे (WhatsApp Group 512 Members). हे फिचर बेटा व्हर्जनसाठी उपलब्ध होते, पण आता हे सर्वंच व्हर्जनवर उपलब्ध केले जात आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button