amitabh bachchan : ‘डॉन’च्या तिकिटांसाठी लांबलचक रांगा, बिग बींनी शेअर केला थ्रोबॅक फोटो | पुढारी

amitabh bachchan : 'डॉन'च्या तिकिटांसाठी लांबलचक रांगा, बिग बींनी शेअर केला थ्रोबॅक फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (amitabh bachchan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. एक महान नायक आजही हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे अमिताभ बच्चनचं होय. इन्स्टाग्रामवर अभिनेत्याने जुन्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॅक अँड व्हाईट फोटोंसह एक जुना किस्सा सांगितला आहे. लोक थिएटरबाहेर लांबच लांब रांगेत उभे आहेत आणि तिकिट खिडकी जवळ जाण्याची वाट पाहत आहेत, असे फोटोमध्ये दिसत आहे. (amitabh bachchan)

बिग बींना आठवले जुने दिवस

‘डॉन’ चित्रपटाची तिकिटे घेण्यासाठी लोक एवढ्या लांब रांगेत उभे आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या ‘डॉन’ चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग. होय. लोकांची रांग खूप लांब आहे. हा १९७८ साली रिलीज झाला होता. तसेच ‘कस्मे वादे’ ‘ , ‘त्रिशूल’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘गंगा की सौगंध’ देखील याच वर्षी प्रदर्शित झाले. एका वर्षात पाच ब्लॉकबस्टर. त्यापैकी काही चित्रपटगृहांमध्ये ५० आठवडे चालले. तेही दिवस काय होते!”

अमिताभ बच्चन हे बिग बी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते ७० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीचे सम्राट राहिले आहेत. त्याला ‘अँग्री यंग मॅन’ ही पदवी मिळाली. ‘जंजीर’ चित्रपटात ते अँग्री मॅनच्या भूमिकेत दिसले होते. ७० आणि ८० च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत आपले पाय चांगलेच रोवले होते. या वयातही ते इंडस्ट्रीत सक्रिय दिसतो.

अमिताभ बच्चन यांचा पुढचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह, नागार्जुन, मौनी रॉयसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अयान मुखर्जीने चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रणबीर आणि आलियाचा एकत्र हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ९ सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

Back to top button