अग्निपथ योजना : पीएम मोदींकडून देशातील तरूणांची थट्टा, त्यांनी माफी मागावी; नाना पटोलेंची मागणी | पुढारी

अग्निपथ योजना : पीएम मोदींकडून देशातील तरूणांची थट्टा, त्यांनी माफी मागावी; नाना पटोलेंची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अग्निपथ योजना जाहीर करून पंतप्रधान मोदी सरकारने देशातील तरूणांची फसवणूक केली आहे. अशा भडक योजना आणत मोदींकडून देशातील तरूणांची थट्टा सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी देशातील तरूणांची माफी मागावी अशी मागणी करत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, गेले चार वर्षापासून देशात बेरोजगारी आहे. शेतकरी आणि कामगारांनंतर आता मोदी सरकार देशातील युवकांच्या भविष्याशी खेळत आहे. अग्निपथ योजना घोषित करून मोदी सरकारने पुन्हा एकदा अविचारी निर्णय घेतला आहे. ही योजना घोषित करून मोदी सरकारने देशातील तरूणाईबरोबर क्रूर विनोद केला असल्याचेही मत पटोलेंनी व्यक्त केले आहे.

 देशातील तरूणांना आवाहन

मोदी सरकारने घोषित केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरु आहेत. कोणत्याही योजनेचा अभ्यास न करता मोदी सरकार योजना अंमलात आणत आहे. यापूर्वी कृषी कायदे आणि आता अग्निपथ योजना❗️ या योजनेविरुद्ध रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांना मी आवाहन करतो की, आंदोलन करून आपला वैचारिक विरोध नक्की दर्शवा, परंतु कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नका. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान हे आपलेच नुकसान आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button