Honeytrap : इस्टाग्रामवरील तरुणीचा बिल्डरवर हनीट्रॅप, बुलाती है मगर जाने का नही... | पुढारी

Honeytrap : इस्टाग्रामवरील तरुणीचा बिल्डरवर हनीट्रॅप, बुलाती है मगर जाने का नही...

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पनवेल येथील एका बांधकाम व्यवसायिकाची इन्स्टाग्रामवर पुण्यातील तरुणीसोबत ओळख झाली. संबंधित तरुणीने व्यवसायिकाला आपल्या जाळ्यात (Honeytrap) खेचले. त्यानंतर त्याला भेटण्याच्या बहाण्याने पुण्यात बोलावले. मात्र पुण्यात येऊन तरुणीला भेटणे या व्यवसायिकाला चांगलेच महागात पडले आहे.

बलात्काराची पोलिसात खोटी तक्रार देण्याच्या धमकीने तरुणी व तिच्या तिघा साथीदारांनी व्यवसायिकाला मारहाण करत पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली.

तसेच खिशातील पन्नास हजाराची रोकड व एटीएम कार्डमधून तीस हजार असे ७० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे तरुणी व तिच्या साथीदारांकडून पैशासाठी तगादा लावला जात होता.

कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार

याप्रकरणी, मातेश्वरीनगर आकुर्ली न्यु पनवेल येथील ३१ वर्षीय व्यवसायिकाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इस्टाग्राम आयडीवरील महिला व तिच्या तिघा साथीदारांच्या विरुद्ध खंडणी, जबरी चोरी, मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी(दि. ०८) दुपारी साडेतीनच्या सुमारास येवलेवाडी कोंढवा परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे पनवेल येथील असून, व्यवसायिक आहेत. मागील काही दिवसापुर्वी त्यांची इन्स्टाग्रामवरती पुण्यातील एका तरुणीसोबत ओळख झाली होती.

ओळखीतून त्यांचा परिचय वाढत गेला. रविवारी तिने व्यवसायिकाला भेटण्यासाठी कोंढवा येथील येवलेवाडी परिसरात बोलाविले होते.

त्यानुसार व्यवसायिक आला होता. त्यावेळी आरोपी तरुणीने त्यांच्या अंगाशी झटून जबरदस्तीने शारिरीक संबंध (Honeytrap) ठेवण्यास भाग पाडले.

त्यानंतर व्यवसायिक हा त्यांच्याकडील चारचाकी गाडीत बसून तरुणीसोबत निघाले होते. दरम्यान अचानक तिघा अनोळखी व्यक्तींनी गाडी अड़वून गाडीत बसून त्यांना मारहाण केली.

बलात्कार केल्याची खोटी तक्रार

तसेच इन्स्टाग्रामवरील महिलेसोबत बलात्कार केला असल्याची पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर संबंधित आरोपी महिलेसोबत त्यांना लग्न करावे लागेल, असे कागदावर लेखी घेतले. त्यावर व्यवसायिकाची सही व हाताचा अंगठा देखील घेतला.

त्यानंतर व्यवसायिकाकडे पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली. यावेळी व्यवसायिकाच्या खिशातील 50 हजाराची रोकड व त्यांच्या जवळील एटीएम कार्डद्वारे 30 हजार असे 70 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर व्यवसायिक पनवेल येथे गेले होते.

मात्र आरोपी महिला व तिच्या इतर साथीदारांनी त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. शेवटी त्यांनी तीन दिवसापुर्वी कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक चैत्रीली गपाट करीत आहेत.

– पाच लाखाच्या खंडणीची मागणी

– जबरदस्तीने उकळले 70 हजार

– कागदावर घेतली सही व हाताचा अंगठा

Back to top button