शिवाजीराव भोसले बँकेकडून 263 कोटींचे वाटप पूर्ण; बँकेचे अवसायक धोंडकर यांची माहिती | पुढारी

शिवाजीराव भोसले बँकेकडून 263 कोटींचे वाटप पूर्ण; बँकेचे अवसायक धोंडकर यांची माहिती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अवसायनात काढण्यात आलेल्या येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी असलेले 281 कोटी रुपयांचे क्लेम मंजूर केले असून, बँकेने सुमारे 263 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. याबाबत माहिती सहकारी संस्थांचे उपनिबंधक आणि शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे अवसायक आर. एस. धोंडकर यांनी माहिती दिली आहे.

अजूनही काही ठेवीदारांनी मंजूर रक्कम परत घेण्याकरिता कागदपत्रे जमा केलेली नाहीत किंवा काही ठेवीदारांनी केवायसी पूर्ण न केल्यामुळे ठेव विमा महामंडळाकडून क्लेम नामंजूर केले असून, अर्ज दाखल करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्बंधामुळे बँकेच्या सर्व ठेवीदारांना त्यांच्या एकूण ठेवींपैकी पाच लाखांपर्यंत रक्कम ठेव विमा महामंडळाद्वारे (डीआयसीजीसी) ठेव संरक्षण उपलब्ध आहे.

पुणे : सांगवी परिसरातील पेरण्या खोळंबल्या

त्यासाठीचा क्लेमफॉर्म हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे, तरी ठेवीदारांनी याबाबतचा अर्ज आवश्यक त्या माहितीसह संबंधित शाखेत दाखल करणे आवश्यक आहे. ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन ’डीआयसीजीसी’ने रक्कम मिळण्यासाठीचे फॉर्म्स दाखल करण्याची मुदत 15 जुलै 2022 पर्यंत वाढविलेली आहे.

तरी ठेवीदारांनी अद्यापपर्यंत क्लेम फॉर्म दाखल केलेले नसतील, अशा ठेवीदारांनी 30 जूनपर्यंत ते दाखल करावेत. मुदतीत फॉर्म्स दाखल न केल्याने ठेवीदार संरक्षित ठेव रकमेपासून वंचित राहिल्यास त्यासाठी बँक जबाबदार राहणार नसल्याचेही धोंडकर यांनी कळविले आहे.

हेही वाचा

वारीमध्ये वॉकीटॉकीवरून संवाद; शासकीय अधिकार्‍यांचा संपर्क अखंड सुरू राहण्यासाठी निर्णय

बारामती तालुका अद्याप कोरोनामुक्त

पुण्यातून धावणार 530 बस; पंढरपूर वारीसाठी एसटी प्रशासन सज्ज

Back to top button