

पुढारी ऑनलाईन डेस्क
साऊथ अभिनेत्री नयनतारा (nayanthara) ने तिचा मित्र विग्नेश शिवन (Vignesh Shivan) सोबत सात फेरे घेतले आहेत. नयनताराच्या लग्नाचीही जोरदार चर्चा झाली. चेन्नईमध्ये मोठ्या धामधुमीने लग्नाच्या बंधनात दोघे अडकले. लग्नानंतर दोघेही तिरुपतीला गेले. तिरुपती मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. पण, पादत्राणे घालून तिने मंदिर परिसरात प्रवेश केल्याने मंदिर प्रशासनाने त्यांच्याविरोधात कायदेशीर नोटिस जारी केली आहे. (nayanthara)
९ जून, २०२२ रोजी विघ्नेश शिवनशी लग्न केल्यानंतर, नववधू नयनतारा तिरुमला तिरुपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. तिरुमला तिरुपती देशस्थानम बोर्डाचे मुख्य दक्षता सुरक्षा अधिकारी नरसिंह किशोर यांच्या म्हणण्यानुसार, नयनतारा माडा रस्त्यावर पादत्राणे घालून फिरताना दिसली. ते एक पवित्र ठिकाण आहे. इतकेच नाही तर सुरक्षा अधिकाऱ्याचे असेही म्हणणे आहे की, नयनतारा आणि विघ्नेशने त्यांच्यासोबत छायाचित्रकारांनाही मंदिरात आणले होते, जे बेकायदेशीर आहे. तिरुमला तिरुपती देशस्थानम खासगी कॅमेऱ्यांना परवानगी देत नाही.
मुख्य दक्षता सुरक्षा अधिकारी नरसिंह किशोर म्हणाले, "नयनतारा पादत्राणे घालून माडा रस्त्यावर फिरताना दिसली. आमच्या सुरक्षा पथकाने त्वरित कळवले. त्यांनी तिथे फोटोशूट केल्याचेही आम्ही सीसीटीव्हीत पाहिले आहे. आम्ही नयनताराला नोटीस देत आहोत. आम्ही तिच्याशीही बोललो आहोत आणि तिला भगवान बालाजी, टीटीडी आणि यात्रेकरूंची माफी मागणारा व्हिडिओ रिलीज करायचा होता. मात्र, आम्ही त्यांना नोटीस देणार आहोत."
नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या तिरुपती मंदिराच्या भेटीदरम्यानचे काही फोटोही सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये अभिनेत्री पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने मंगळसूत्र आणि सोन्याच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला. त्याचवेळी विघ्नेश धोती-कुर्ता परिधान केलेला दिसला.
विघ्नेश शिवनने लग्नानंतर लगेचच नयनतारासोबत लग्नाचा पहिला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये, विघ्नेश लग्नाच्या विधीनंतर त्याची प्रेयसी नयनताराच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. हे शेअर करताना विघ्नेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, "१० च्या प्रमाणात. ती नयन आणि मी एक आहे. देवाच्या कृपेने आमचे लग्न झाले."
लग्नासाठी, नयनताराने मोनिका आणि करिश्माने डिझाइन केलेली एक सुंदर सिंदूर लाल साडी नेसली होती. यामध्ये ती अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती. तिने पन्ना चोकर आणि मोठा रशियन टंबल नेकलेस आणि सताल्डा नेकलेससह तिचा लूक पूर्ण केला होता. घ्नेश शिवनने लग्नासाठी मोनिका आणि करिश्माने डिझाईन केलेला कुर्ता आणि शाल निवडली होती.