भारतीय राज्यघटना हा पवित्र ग्रंथ: जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख | पुढारी

भारतीय राज्यघटना हा पवित्र ग्रंथ: जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख

मांजरी, पुढारी वृत्तसेवा: ‘भारतीय राज्यघटना ही आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा पवित्र ग्रंथ आहे,’ असे मत प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शिवाजी मराठा सोसायटीचे विधी महाविद्यालय, तसेच येथील शिवसाई मित्रमंडळाच्या वतीने कायदेविषयक जनजागृती अभियानांतर्गत शेतकरी व कामगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख बोलत होते. ‘समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत भारतीय घटनेची माहिती पोहचविणे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उरलेले काम आपल्याला करायचे आहे.

मोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांची देहू भेट

भारतीय नागरिकांना एकसंध ठेवणारा हा घटना ग्रंथ जपण्याची जबाबदारी प्रत्येकाने पेलली पाहिजे’ असेही त्यांनी सांगितले. बाबू वाघमारे, अमित आबा घुले, बंडू शेळके, तुषार घुले या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ विधितज्ञ अ‍ॅड. सुधाकर आव्हाड यांनी ‘शेतीविषयक कायदे’ या विषयावर शेतकरी व कामगार वर्गाला मार्गदर्शन केले,

अ‍ॅड. शरद मडके यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019, तर अ‍ॅड. पांडुरंग थोरवे यांनी ‘दस्त नोंदणी- शासनाची महत्त्वाची परिपत्रके व अध्यादेश’ या विषयावर मार्गदर्शन केले. बार असोसिएशनच्या सेक्रेटरी अ‍ॅड. सुरेखा भोसले यांनी संयोजन केले. माजी उपसरपंच अमित घुले यांनी आभार मानले.

Back to top button