माय-लेकींना एकाच वेळी मिळाली विद्यापीठाची पदवी! | पुढारी

माय-लेकींना एकाच वेळी मिळाली विद्यापीठाची पदवी!

पुणे, पुढारी वृत्तसेवा: घरातील कामे, शासकीय नोकरी सांभाळतानाच शिक्षणाची आवड जोपासत प्राध्यापिकेने वयाच्या पन्नासाव्या वर्षी पीएचडी मिळवली आहे. विशेष म्हणजे त्याचदरम्यान त्यांच्या मुलीनेही इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. एकाच वेळी माय-लेकींचा गौरव करण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आंतर्विद्या शाखेअंतर्गत प्रौढ, निरंतर शिक्षण व ज्ञान विस्तार या विषयामध्ये डॉ. अनिता भाऊसाहेब महिरास यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांना विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील प्रा. डॉ. सतीश शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. अनिता महिरास या विभागातील पीएच.डी. धारक ठरल्या आहेत.

‘पालखी’त वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्या; जि. प. सीईओंची सूचना

तसेच त्यांची मुलगी कांचन भाऊसाहेब महिरास यांनी बीई कॉम्प्युटरमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इंजिनिअरची पदवी प्राप्त केली आहे. कांचन मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनी आहेत. तसेच, डॉ. अनिता या यशदा येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, ‘ग्रामीण विकास’ या विषयावर मार्गदर्शन करतात. त्यांनी जून 2018 मध्ये पीएचडीसाठी नोंदणी केली होती.

त्यावेळी या विभागासाठी केवळ चार मुलींनीच नोंदणी केली होती. त्यातूनही डॉ. अनिता या विषयावर पीएचडी मिळविणार्‍या पहिल्या महिला ठरलेल्या असल्याचे डॉ. अनिता यांचे पती भाऊसाहेब महिरास यांनी सांगितले.

 

Back to top button