Malvika Gaekwad : मुळशी पॅटर्नच्या 'चहावाली'ची परदेशवारी, आता अशी दिसते | पुढारी

Malvika Gaekwad : मुळशी पॅटर्नच्या 'चहावाली'ची परदेशवारी, आता अशी दिसते

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री मालविका गायकवाड आठवते का? ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात मालविकाने ‘चहाची टपरी’ चालवणाऱ्या मुलीची भूमिका तिने साकारली होती. ही मुलगी ‘राहुल्या’ची मैत्रीण होती. आता काही दिवसांपूर्वी मालविकाने आपले परदेशवारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. : मुळशी पॅटर्नमध्ये आपल्या अदाकारीने सवार्वांना ममोहून टाकणारी मालविका इतक्या वषार्षांमध्ये खूप बदललेली दिसते.

मालविका आपल्या पतीसोबत एडिनबर्ग, स्कॉटलंडला गेली होती. मागील महिन्यात तिने आपल्या परदेशवारीचे फोटो शेअर केले आहेत. तिने Loch Ness या ठिकाणचा एक सुंदर तलावाचा व्हिडिओही शेअर केला आहे. स्कॉटलंडमधील चेरी ब्लॉसमचे व्हिडिओही शेअर केले आहेत. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला खूप सारे फोटोज आणि व्हिडिओजही शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malvika Gaekwad (@malvika_gaekwad)

मालविका गायकवाड ही पुण्यातच मोठी झाली आहे. पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून तिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malvika Gaekwad (@malvika_gaekwad)

खूप कमी लोकांना कदाचित माहिती असेल की, मालविका ही बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malvika Gaekwad (@malvika_gaekwad)

तिने मुळशी पॅटर्न केला. पण, याचं चित्रपटातून ती प्रसिध्दीच्या झोतात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malvika Gaekwad (@malvika_gaekwad)

मालविकाला निसर्गात फिरायला आवडत. त्याचबरोबर तिला शेतीही करायला आवडतं. तिने नोकरीही केली. परंतु, या नोकरीत तिचे मन रमले नाही. निसर्गावर प्रेम असणाऱ्या मालविकाने सर्व सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी मालविकाला लोकांनी वेड्यात काढलं होतं. पण, कुणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता तिने सेंद्रीय शेतीकडे लक्ष दिलं. द ऑरगॅनित कार्बन नावाची कंपनी सुरू केली. यावर तिने तब्बल १८ कोटींचा व्यवसाय उभारलाय.

२०२० साली मालविकाने सिद्धार्थ सिंघवी या आपल्या मित्रासोबत लग्न केले आहे. मालविकाचे रॉयल लग्न गाजले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malvika Gaekwad (@malvika_gaekwad)

Back to top button