नाशिक : रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा, नागरिकांकडून कौतुक | पुढारी

नाशिक : रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा, नागरिकांकडून कौतुक

नाशिक : शिर्डी येथून नाशिक येथे आलेल्या प्रवाशांच्या ऑटो रिक्षात राहिलेल्या बॅगा आणि रोख रक्कम अंबड, चुंचाळे येथील प्रामाणिक रिक्षाचालक अकबर मिर्झा बेग यांनी परत केल्या. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल जुने सिडकोतील सावरकर चौक येथील नागरिकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

शंकर कटारे हे शालिमार येथून रिक्षात बसले आणि सावरकर चौक येथे उतरल्यावर त्यांनी रिक्षा भाडे दिले. परंतु, काही वेळाने त्यांना लक्षात आले की, त्यांच्या दोन पिशव्या रिक्षातच राहिल्या होत्या. रिक्षा निघून गेल्यावर त्यांनी सावरकर चौक भागातील काही नागरिकांशी संपर्क साधत माहिती दिली. या भागातील भाजप मंडल अध्यक्ष, वंदे मातरम् मंडळाचे अध्यक्ष राहुल गणोरे यांनी नागरिकांसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून रिक्षा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही आढळून आले नाही.

रिक्षाचालक (रिक्षा क्र. एमएच 15, एफयू 6101) अकबर मिर्झा बेग रा. घरकुल अंबड, चुंचाळे यांना आपल्या रिक्षात पिशव्या आढळून आल्याने लागलीच सावरकर चौक येथे धाव घेतली आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने प्रवासी अशोक कटारे यांच्या दोन पिशव्या परत केल्या. बेग यांच्या प्रामाणिकपणाबद्दल राहुल गणोरे व नागरिकांनी सत्कार केला.

हेही वाचा :

Back to top button