नसीरुद्दीन शाह यांनी ‘द काश्मीर फाईल्स’वर केली टीका, आता विवेक अग्निहोत्रींचे ट्विट व्हायरल | पुढारी

नसीरुद्दीन शाह यांनी 'द काश्मीर फाईल्स'वर केली टीका, आता विवेक अग्निहोत्रींचे ट्विट व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क

पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी नुपुर शर्मा यांनी वादग्रत विधान केल्यानंतर देशभरातून याची निंदा होत आहे. दरम्यान, अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी एका खासगी टीव्ही चॅनेलशी बातचीत केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशात जे लोक शांती आणि एकतेच्या गोष्टी करतात, त्यांना तुरुंगात पाठवलं जातं. जे लोक नरसंहारच्या गोष्टी करतात, त्यांना किरकोळ शिक्षा दिली जाते. नुपुर शर्माने नुकत्याच एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर यांच्यावर वादग्रस्त विधान केलं होतं. यावर खूप मोठा गोंधळ झाला होता. यानंतर भाजपने नुपुर शर्मा यांना पक्षातून ६ महिन्यांसाठी निलंबित केलं होतं. यावर आता ‘द काश्मीर फाईल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही प्रतिक्रिया दिलीय. अग्निहोत्री म्हणाले की, ते नसीरुद्दीन शाह यांच्याशी सहमत आहेत.

नसीरुद्दीन शाह यांनी एका टीव्ही चॅनेलला मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’वर टीका केली. काश्मिरी हिंदूंद्वारा झेललेलं दु:खाचं ‘फिक्शनल व्हर्जन’ असल्याचं म्हटलं. नसीरुद्दीन शाह यांनी हेदेखील सांगितलं की, सरकार काश्मिरी हिंदुंची सुरक्षा आणि पुनर्वास सुनिश्चित करण्याऐवजी यास प्रोत्साहन देत आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, ते नसीरुद्दीन शाह यांच्या विधानाशी सहमत आहेत. त्यांनी लिहिलं की, ‘आपल्याचं देशात काश्मिरी हिंदू नरसंहाराविषयी बोलल्यावर शिव्या दिल्या जातात आणि शिक्षा दिली जाते.’

याआधी विवेक अग्निहोत्री यांनी निलंबित नुपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ एक ट्विटदेखील केलं होतं. नुपुर शर्मा यांनी वाढत्या वादानंतर आपल्या विधानासाठी माफी मागितली. विवेक अग्निहोत्री यांनी नुपुर शर्मा यांचे समर्थन करत एक ट्वि केलं होतं. ‘मी नुपुर शर्मा यांच्यासोबत उभा आहे. आता वेळ आलीय, आता तुम्हाला तुमच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून नुपुर शर्मा दुर्गा करायला हवं.’

Back to top button