Mahima Chaudhary : महिमा चौधरीला स्तनाचा कर्करोग, ओळखणंही झालं कठीण (Video) | पुढारी

Mahima Chaudhary : महिमा चौधरीला स्तनाचा कर्करोग, ओळखणंही झालं कठीण (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना कॅन्सर होणं, काही नवीन गोष्ट नाही. सोनाली बेंद्रे, ताहिरा कश्यप, मनीषा कोईराला यासारख्या अनेक सेलिब्रिटीजना कॅन्सर झाला होता. काही सेलिब्रिटींनी कॅन्सरवर मातदेखील केली. आता बॉलिवूडमधून आणखी एका अभिनेत्रीला कॅन्सर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बॉलिवूडची अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary ) हिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे वृत्त समोर आले आहे. (Mahima Chaudhary )

परदेस चित्रपटात काम करून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री महिमाला स्तनाचा कर्करोग झाला आहे. याचा खुलासा करत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये महिमा चौधरी सांगत आहे की, कसे अनुपम खेरने तिला एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी यूएसमधून बोलावले. त्यानंतर तिने अनुपम यांना तिच्या आजाराविषयी सांगितले. यादरम्यान महिमा बोलत असताना भावूक होते.

अनुपम खेर यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती खिडकीजवळ बसलेली दिसत आहे. या आजारामुळे तिचे केसही गळू लागले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला महिमाने सांगितले की, अनुपम खेरने तिला तिच्या यूएस नंबरवरून कॉल केला. त्यामुळे तिला समजले की, हा एक अर्जंट कॉल असेल आणि तिला तो कॉल उचलावा लागेल.

अनुपमने तिला चित्रपट करायला सांगितले. पण महिमा म्हणाली की तिला हा चित्रपट करायला आवडेल. पण अनुपम याची वाट पाहू शकतील का? महिमाचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात ती सुरुवातीला हसत बोलते पण अचानक ती रडू लागते.

महिमा पुढे सांगते की, जेव्हा वाट पाहण्यास सांगितले तेव्हा अनुपम खेर म्हणाले, ‘नाही नाही मी थांबू शकत नाही. तू कुठे आहेस?’ महिमा चौधरीने सांगितले की, तिचे केस गळत आहेत.

तिला वेब सीरीज आणि चित्रपटांसाठी कॉल येत आहेत. हे सांगताना महिमा रडू लागते आणि व्हिडिओमध्ये पुढे म्हणते, ‘मी म्हणाले की मी सेटवर विग घालून येऊ का? यानंतर अनुपम खेर यांनी त्यांना याचे कारण विचारले असता महिमाने त्यांना आपल्याला कॅन्सर असल्याचे सांगितले.

कॅन्सरबद्दल असे समजले

अनुपम खेर यांनी महिमाला विचारलं की, तिला ब्रेस्ट कॅन्सर आहे, हे कसं समजलं? यावर महिमाने सांगितलं की, तिला ब्रेस्ट कॅन्सरची कोणतीही लक्षण नाहीत. ती प्रत्येक वर्षी आपलं चेकअप करते. महिमाने सांगितलं की, तिची टेस्ट करणाऱ्या व्यक्तीने तिला डॉक्टर मंदर यांना भेटायला सांगितले. महिमाने सांगितलं की तिची बायोप्सी झाली. त्यानंतर तिला या आजाराविषयी समजलं. महिमाने या व्हिडिओमध्ये सांगितलं की, कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजमध्ये होतं. हा कॅन्सर पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

Back to top button