HBD Amisha Patel : ‌अमिषाचे करिअर वादांमुळे संपुष्टात आले का?

amisha patel
amisha patel
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणत्याही कलाकाराला काम मिळवणं, त्या मिळालेल्या संधीचे सोने करणे आणि यश प्राप्त करणे ही काही सोपी बाब नाही. जे कलाकार हे करू शकतात ते अगदी सुपरस्टारपद मिळवतात. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांच्यावर अभिनय कारकिर्द सोडण्याची वेळ येते. अभिनयाचे क्षेत्र सोडाव्या लागलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री आमिषा पटेल. पण, अनेक वादांमध्ये सापडल्यामुळे अमिषा पटेलचे करिअर संपुष्टात आले का? आज ती आपला वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया या बोल्ड अमिषा विषयी. (HBD Amisha Patel )

अभिनेत्री अमिषा पटेलने 'कहो ना प्यार है' या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यावेळी तिच्या सौंदर्याची इतकी चर्चा झाली की, प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडला. एका साबणाच्या जाहिरातीत झळकलेली अमिषाला पहिलाचं चित्रपट मिळाला आणि ती रातोरात स्टार झाली. क्यूंट दिसणारी अमिषाने आपल्या भोळ्याभाबड्या चेहऱ्याने सर्वांना मोहित केलं.

हृतिक रोशनसोबत तिने कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर अमिषा आणि हृतिक रातोरात स्टार झाले होते. या सिनेमानंतर 'गदर एक प्रेमकथा' सनी देओलसह आमिषा पटेलचा हा सिनेमाही सुपरहिट ठरला. एका पाठोपाठ मिळणारे सुपरहिट चित्रपट आणि अमाप प्रसिध्दी, पैसा सर्वकाही तिच्याकडं येत गेलं. यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यानंतरही अमिषाचे हे यश दीर्घकाळ टिकून राहिले नाही. ती चित्रपटांपेक्षा अधिक वादांमध्ये सापडत गेली. कधी राजकीय तर कधी ड्रेसमुळे…वाद आणि ट्रोल होणं, नित्याचचं झालं. चित्रपटांपेक्षा जास्त तिचं नाव वादांमध्ये राहिले आहे. कदाचित या वादामुळेच अमिषाचे करिअर संपुष्टात आले का? असाही प्रश्न उद्भवतो.

'हमराज' नंतर लागला ब्रेक

अमिषाच्या चित्रपटांबद्दल बोलायाचे झाले तर, २००२ साली प्रदर्शित झालेल्या 'हमराज' चित्रपटानंतर अमिषाच्या करिअरला ब्रेक लागला.  पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप ठरत गेले. करिअरला सुरुवात केली त्यावेळी अमिषाने 'सिलेक्टीव्ह' होण्याऐवजी एकापाठोपाठ एक डझनभर सिनेमे साईन केले. मात्र, बहुतांश तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आणि अमिषाच्या करिअरची नौका डळमळू लागली. या झटक्यातून सावरायला तिला तीन वर्षं लागली.

२००६ मध्ये अब्बास मस्तानच्या 'हमराज'ने तिच्या करिअरला काहीसा आधार दिला. पण तोपर्यंत अमिषाचे स्टारडम संपले होते. २०१८ साली 'भैयाजी सुपरहिट' हा तिचा चित्रपट रिलीज झाला. पण हा चित्रपटही सटकून आपटला. यानंतर अमिषाने काही तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले. पण त्यातही तिला यश मिळालं नाही.

खरंतर बॉलीवूडमध्ये उच्च शिक्षण घेणारी अभिनेत्री म्हणून अमिषाची ओळख आहे. अमिषाने इकोनॉमिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट मिळवले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अमिषा कोणत्याही चित्रपटांत झळकलेली नाही. काम मिळत नसल्याने ती सध्या सिनेसृष्टीपासून दूर झाली, असेही म्हणायला हरकत नाही.

वडिलांवरही पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप

अमिषाचे तिच्या कुटुंबासोबत वाद झाले होते. तिने स्वतःच्या वडिलांवरही गंभीर आरोप केले. अमिषाने तिच्या वडिलांवर १२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. माझे वडील माझ्या पैशांचा गैरवापर करतात; असा आरोप तिने केला होता. त्यासाठी अमिषाने वडिलांना कायदेशीर नोटीसदेखील पाठवली होती.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमिषाने सांगितले होते, 'तिचे वडील तिच्या कमाईचा दुरुपयोग करीत आहेत.' या बातमीचा थेट परिणाम अमिषा पटेलच्या कारकीर्दीवर होऊ लागला. त्याचवेळी अमिषा पटेलचे एका प्रसिद्ध दिग्दर्शकासह अफेअर सुरु झाले होते. आमिषाचे प्रेमात पडणे तिच्या पालकांना अजिबात मान्य नव्हते. अमिषाच्या आई-वडिलांनी तिला घरातून हाकलून दिले होते, असेही वृत्त समोर येऊन धडकले.

आमिषा इथेच शांत बसली नाही. तिने थेट प्रेस कॉन्फरन्स बोलावली आणि त्यात तिच्या आईवरच तिने खूप गंभीर आरोप केले. आईने चपलांनी मारत तिला घराबाहेर काढल्याचे तिने मीडियाला सांगितले. तिच्या या मुलाखतीचा थेट परिणाम करिअर होत गेला.

दरम्यान, निर्माता निर्देशक विक्रम भट्टसोबत तिचे नाव जोडल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. मात्र तिचे ही नाते फार काळ टिकले नाही. कौंटुंबिक वाद आणि रिलेशनशीपमधील दुःख सावरण्यासाठी तिने मद्यप्राशनास सुरूवात केली असल्याचे वृत्तही झळकू लागले. या सर्वांचा परिणाम तिच्या करिअरवर होत गेला. अमिषाच्या २१ वर्षाच्या बॉलीवूड करिअरमध्ये केवळ तीनच चित्रपट हिट ठरले आहेत.

रुपेरी पडद्यावर आमिषाची जादू चालली नसली तरी तिचे बोल्ड फोटो पाहून तिचे चाहते मात्र घायाळ होत असतात. पूर्वीपेक्षा ती आता जरा जास्तच बोल्ड झाल्याचे पाहायला मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news