बारावीत सहा लाख विद्यार्थी 60 टक्क्यांखाली!

बारावीत सहा लाख विद्यार्थी 60 टक्क्यांखाली!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बारावी निकालातील गुणवंतांचा फुगा यंदा फुटला असून, राज्यात एकही विद्यार्थी शतप्रतिशत गुण मिळवू शकला नाही. तर, 5 लाख 85 हजार 317 विद्यार्थ्यांना 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण आहेत. 4 लाख 94 हजार 466 विद्यार्थ्यांना 45 ते 60 टक्के, तर 90 हजार 851 विद्यार्थ्यांना 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा राज्यात 10 हजार 47 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. 36 हजार 370 विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्के, 72 हजार 575 विद्यार्थ्यांना 80 ते 85 टक्के, 1 लाख 11 हजार 867 विद्यार्थ्यांना 75 ते 80 टक्के, 1 लाख 51 हजार 843 विद्यार्थ्यांना 70 ते 75 टक्के, 1 लाख 83 हजार 694 विद्यार्थ्यांना 65 ते 70 टक्के, 2 लाख 23 हजार 646 विद्यार्थ्यांना 60 ते 65 टक्के, 4 लाख 94 हजार 466 विद्यार्थ्यांना 45 ते 60 टक्के आणि 90 हजार 851 विद्यार्थ्यांना 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे शाळा तिथे परीक्षा केंद्र असूनही विद्यार्थ्यांना चांगले गुण का मिळविता आले नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

21 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकालात भोपळा

राज्यात शाळा तिथे परीक्षा केंद्र असूनही तब्बल 21 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. यामध्ये कला शाखेची 7, वाणिज्य शाखेची 6, तर विज्ञान शाखेची 8 महाविद्यालये आहेत. 242 गैरप्रकारांची नोंद झाली, त्यात 5 विद्यार्थ्यांना तोतयेगिरी करताना पकडण्यात आले. 2020 मध्ये झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेत 996 गैरप्रकार नोंदविण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news